ठक्कर डोम मध्ये किरकोळ आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 00:57 IST2021-05-18T22:59:00+5:302021-05-19T00:57:32+5:30
नाशिक : उंटवाडी येथील ठक्कर डोममध्ये उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरच्या परिसरात किरकोळ स्वरूपात रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली मात्र या ठिकाणी अगोदरपासूनच सज्ज असलेल्या अग्निशमन दलाच्या बंबामुळे अनर्थ टाळला.

तत्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग पसरण्यापूर्वी नियंत्रणात आणली या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. कोविड केअर सेंटर च्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने या ठिकाणी एक बंब कायमस्वरूपी सज्ज ठेवलेला आहे त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे नागरिकांनी सांगितले. सेंटरच्या परिसरात अचानकपणे धुराचे लोट उठल्याने धावपळ झाली आणि जवानांनी तात्काळ या दिशेने धाव घेत पाण्याचा मारा करून आग विझवली.