गृहराज्यमंत्री राम शिंदे रविवारी हरसूलला
By Admin | Updated: July 18, 2015 00:22 IST2015-07-18T00:22:06+5:302015-07-18T00:22:45+5:30
गृहराज्यमंत्री राम शिंदे रविवारी हरसूलला

गृहराज्यमंत्री राम शिंदे रविवारी हरसूलला
नाशिक : राज्याचे गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे रविवारी (दि.१९) हरसूलच्या दंगलग्रस्त भागाला भेट देणार आहेत.
कालच (दि. १७) यासंदर्भात माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना तातडीने मुंबईला पाचारण केले होते. खासदार चव्हाण दुपारनंतर मुंबईत दाखल झाले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने गुजरातला जावे लागल्याने खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांशी भेट होऊ शकली नाही. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी हरसूलच्या दंगलग्रस्त घटनेची माहिती गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांना दिली. शिंदे रविवारी दुपारी १ वाजता हरसूलला भेट देणार असल्याचे यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना चर्चा करताना सांगितले. जिल्हा पोलिस प्रमुख संजय मोहिते यांनी ग्रामस्थ दुकानदार आणि लोक प्रतिनिधींसमवेत बैठक घेऊन बाजारपेठ खुली करण्याचे आवाहन केले़ तसेच या दंगलीची न्यायलयीन चौकशी करणार असल्याची माहिती दिली़ मालेगावचे आमदार आशीफ शेख यांनी रमजान ईद साजरी करण्यासाठी गावाबाहेर गेलेल्या ग्रामस्थांना गावात येण्याचे भावणीक आवाहन केले़ गेल्या चार दिवसांपासून त्र्यंबकेश्वर तालुक्यातल हरसूल, ठाणापाड्यासह अन्य ग्रामीण भागात या दंगलीचे लोण पसरत असल्याने स्थानिक पोलीस प्रशासनासमोरील चिंता वाढली होती.
पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, खासदार हेमंत गोडसे, आमदार निर्मला गावित यांनी दंगलग्रस्त भागात फिरून
शांततेचे आवाहन केले होते. हरसूलसह ठाणापाडा येथे कोणतीही अप्रिय घटना न घडल्याने आणि व्यवहार पूर्वपदावर येत असल्याने पोलीस यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)