कांद्याचे किमान निर्यातमूल्य शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:23 AM2018-02-03T00:23:51+5:302018-02-03T00:30:50+5:30

लासलगाव : कांद्याची वाढलेली आवक आणि जवळपास बंद झालेली निर्यात यामुळे आठवड्यापासून कोसळणारे भाव सावरण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य शून्य करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सायंकाळी यासंदर्भातील अधिसूचना सरकारने काढली आहे. या निर्णयामुळे निर्यात वाढून कांद्याचे भाव स्थिरावण्यास मदत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Minimum export value of onion is zero | कांद्याचे किमान निर्यातमूल्य शून्य

कांद्याचे किमान निर्यातमूल्य शून्य

Next
ठळक मुद्देकेंद्र सरकारचा निर्णय निर्यात वाढ होऊन दर स्थिर होण्याची शक्यता

लासलगाव : कांद्याची वाढलेली आवक आणि जवळपास बंद झालेली निर्यात यामुळे आठवड्यापासून कोसळणारे भाव सावरण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य शून्य करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सायंकाळी यासंदर्भातील अधिसूचना सरकारने काढली आहे. या निर्णयामुळे निर्यात वाढून कांद्याचे भाव स्थिरावण्यास मदत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जानेवारीच्या तिसºया सप्ताहात केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य कमी केल्यानंतरही निर्यातीमध्ये न झालेली वाढ, राज्यातील तसेच परराज्यातील बाजारपेठांमध्ये वाढलेली मोठी आवक यामुळे गेला सप्ताहभर कांद्याच्या दरांमध्ये मोठी घसरण होत होती. लासलगावच्या कांदा बाजारामध्ये मागच्या सोमवारी तर सरासरी दरामध्ये ९०० रुपयांची घसरण झाल्याने बळीराजा धास्तावला होता. बाजारात नवीन कांद्याची आवक वाढलेली असताना केंद्र सरकारने कांद्याचे किमान निर्यातमूल्य १५० डॉलरने कमी करून ७०० डॉलर प्रतिटन केले. परंतु श्रीलंकावगळता अन्य कोणत्याही देशामध्ये सध्या कांद्याची निर्यात सुरू नव्हती. यानंतर कांद्याचे निर्यातमूल्य हटवण्यात यावे यासाठी राज्याचे कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनीही केंद्राकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आणि नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहारही केला होता. लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
नोव्हेंबरअखेरपर्यंत देशात कांद्याचा दर सरासरी ३५ रु पये किलो पातळीवर होता. तेव्हा सरकारने निर्यातीला वेसण घालून देशी बाजारात कांदा रहावा म्हणून किमान निर्यातमूल्य ८५० डॉलर प्रतिटन केले होते. त्यानंतर ते ७०० डॉलर प्रतिटन असे खाली आले. तर आता कांद्याचे किमान निर्यातमूल्य शून्य करण्यात आल्याने कांद्याची निर्यात सुरू होण्याची अपेक्षा असून त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कांद्याचा दर वाढू शकतील.
कृषि व प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) च्या आकडेवारीनुसार सन २०१७ च्या आॅक्टोबर महिन्यापर्यंत देशातून १.०३ दशलक्ष टन कांद्याची निर्यात झाली होती. २०१६ साली याच कालावधीत देशातून १.३७ दशलक्ष टन कांदा निर्यात करण्यात आला होता. एप्रिल २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत देशाने ३०.६८ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात केला गेला आहे.
वर्षनिहाय झालेली निर्यात
२००९ -१० - १८.७३ लाख टन
२०१०-११ - १३.४० लाख टन
२०११-१२ - १५.५२ लाख टन
२०१२ -१३ - १८.२२ लाख टन
२०१३ -१४ - १३.५० लाख टन
२०१४ - १५ .- १०.८६ लाख टन
२०१५ -१६ - १९.१४ लाख टन
आॅक्टोबर २०१७ पर्यंत - १.०३ लाख टन
कांद्याचे भाव कोसळत असताना योग्यवेळी केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकºयांना दिलासा देणारा आहे. या निर्णयामुळे कांद्याचे कोसळणारे भाव थांबण्यास मदत होईल.
- नानासाहेब पाटील, संचालक नाफेड

सर्वाधिक निर्यात महाराष्ट्रातून

 भारतातील एकूण कांदा निर्यातीत ८० टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. उर्वरित २० टक्यांमध्ये कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांचा समावेश होतो.जिल्ह्यातून ७५ टक्के यंदाही सर्वाधिक निर्यात महाराष्ट्रातून झालेली आहे. यापैकी ७५ टक्के निर्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून झाली आहे. यापूर्वी किमान निर्यातमूल्य शून्य केल्यानंतर निर्यातीमध्ये भरघोस वाढ झालेली होती.

Web Title: Minimum export value of onion is zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.