जिल्ह्यातील तब्बल २८३५ रुग्णांना अत्यल्प बाधा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 04:39 PM2020-07-26T16:39:33+5:302020-07-26T16:43:50+5:30

नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण अधिक वेगाने वाढत असले तरी जिल्ह्यातील सध्या बाधित असलेल्या एकूण २८८८ अ‍ॅक्टीव्ह रुग्णांपैकी तब्बल १५५९ असिम्पटॅमॅटीक आणि १२७६ अल्प लक्षणे असलेले बाधित आहेत. त्यामुळे एकप्रकारे या अत्यल्प बाधित रुग्णांची बरे होण्याची शाश्वती अधिक आहे.

Minimal disruption to 2835 patients in the district! | जिल्ह्यातील तब्बल २८३५ रुग्णांना अत्यल्प बाधा !

जिल्ह्यातील तब्बल २८३५ रुग्णांना अत्यल्प बाधा !

Next
ठळक मुद्दे१२७६ अल्प लक्षणे१५५९ असिम्पटॅमॅटीक

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण अधिक वेगाने वाढत असले तरी जिल्ह्यातील सध्या बाधित असलेल्या एकूण २८८८ अ‍ॅक्टीव्ह रुग्णांपैकी तब्बल १५५९ असिम्पटॅमॅटीक आणि १२७६ अल्प लक्षणे असलेले बाधित आहेत. त्यामुळे एकप्रकारे या अत्यल्प बाधित रुग्णांची बरे होण्याची शाश्वती अधिक आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत २ हजार ८८८ रु ग्णांवर उपचार सुरु असून रविवार दुपारपर्यंत ४५४ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १८८, चांदवड २४, सिन्नर ११७, दिंडोरी ५०, निफाड १६५, देवळा २१, नांदगांव ६३, येवला ४०, त्र्यंबकेश्वर १५, सुरगाणा १५, पेठ ०३, बागलाण ३६, इगतपुरी १५४, मालेगांव ग्रामीण ४१ असे एकूण ९३२ पॉझटिीव्ह रु ग्णांवर उपचार सुरु आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८७०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ७९ तर जिल्ह्याबाहेरील ०७ असे एकूण २ हजार ८८८ रु ग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात एकूण ११ हजार ९४३ रु ग्ण आढळून आले आहेत. मात्र, त्यातील ८६०१ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन यापूर्वीच घरी परतले आहेत.
इन्फो
अत्यल्प बाधित किंवा लक्षणेहीन आठवडाभरात बरे
ज्या रुग्णांना कोरोनाची अत्यल्प बाधा झालेली आहे किंवा ज्या रुग्णांमध्ये लक्षणे अजिबात नाहीत, केवळ त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे ते बाधित ठरले, अशा रुग्णांना बरे होण्याचा कालावधीदेखील पाच ते सात दिवस अर्थात केवळ एक आठवडा असतो. त्यामुळे असे अत्यल्प बाधित रुग्ण एखाद्या क्वारंटाईन सेंटरमध्येदेखील अगदी सहजपणे उपचार घेऊन बरे होऊ शकतात.
इन्फो
केवळ ९७ रुग्ण व्हेंटिलेटरवर
ज्या रुग्णांना श्वसनाचा प्रचंड त्रास जाणवू लागतो, केवळ अशा रुग्णांनाच आॅक्सिजनवर किंवा सर्वाधिक गंभीर असणाऱ्यांनाच व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. जिल्ह्यात सद्यस्थितीत ६७२ रुग्ण हे आॅक्सिजनवर तर केवळ ९७ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. एकूण बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे.

Web Title: Minimal disruption to 2835 patients in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.