भावली धरण पर्यटनस्थळ करण्याचा मानस : पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 00:24 IST2020-07-25T20:51:55+5:302020-07-26T00:24:11+5:30
नांदूरवैद्य : पर्यटनपूरक असणाऱ्या भावली धरण परिसरात पर्यटनाच्या विविध संधी आहेत. त्यासाठी बोटिंगसह इतर सुविधांच्या दृष्टीने या भागाला प्रगत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.

भावली धरण पर्यटनस्थळ करण्याचा मानस : पाटील
नांदूरवैद्य : पर्यटनपूरक असणाऱ्या भावली धरण परिसरात पर्यटनाच्या विविध संधी आहेत. त्यासाठी बोटिंगसह इतर सुविधांच्या दृष्टीने या भागाला प्रगत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.
इगतपुरी तालुक्यातील भावली आणि वैतरणा धरण परिसरात पाटील यांनी भेट देत पाहणी केली, यावेळी ते बोलत होते. पर्यटकांना आकर्षित करणारे सौंदर्य या भागात असल्याने लवकरच आवश्यक त्या योजना राबविण्यासाठी नियोजन करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार जयंत जाधव, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे, संदीप गुळवे व गोरख बोडके, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, कमलाकर नाठे, रामदास धांडे, अरु ण गायकर, प्रशांत कडू, अर्जुन टिळे, उदय जाधव आदी उपस्थित होते. अतिशय निसर्गरम्य वातावरणात भावली धरण असून, अनेक पर्यटक सुटीच्या दिवशी येथे भेट देतात. त्याअनुषंगाने या धरण
भागात पर्यटन क्षेत्र विकसित केले जाईल. इगतपुरी येथे बरीच प्रेक्षणीय स्थळेही यानिमित्ताने विकसित होतील. नैसर्गिक धबधब्यांचे सुशोभीकरणही करता येऊ शकते, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.