जिल्ह्यात ठिकठिकाणी दूध बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 01:03 IST2020-07-21T21:15:21+5:302020-07-22T01:03:22+5:30
दिंडोरी : दूध बंद आंदोलनाचा नाशिकमध्ये प्रारंभ स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी स्वत:च्याच चिंचखेड , ता.दिंडोरी, नाशिक या गावातील पुरातन शिव मंदिरात दूध अभिषेक करून केला.या वेळेस जि प सदस्य भास्कर भगरे, उपसरपंच सुभाष मातेरे,किरण पाटील, संपत जाधव ,दत्तू सोनवणे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.दुधाला पाच रु पये अनुदान द्या..शेतकरी ऐकजुटीचा विजय असो .या घोषणा देण्यात आल्या.

जिल्ह्यात ठिकठिकाणी दूध बंद आंदोलन
दिंडोरी : दूध बंद आंदोलनाचा नाशिकमध्ये प्रारंभ स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी स्वत:च्याच चिंचखेड , ता.दिंडोरी, नाशिक या गावातील पुरातन शिव मंदिरात दूध अभिषेक करून केला.या वेळेस जि प सदस्य भास्कर भगरे, उपसरपंच सुभाष मातेरे,किरण पाटील, संपत जाधव ,दत्तू सोनवणे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.दुधाला पाच रु पये अनुदान द्या..शेतकरी ऐकजुटीचा विजय असो .या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी केंद्र शासनाने २३ जूनचा दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय त्वरीत रद्द करावा. ३० हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा, तसेच निर्यात अनुदान प्रति किलो ३० रूपये देण्यात यावे.दूध पावडर, तूप, बटर व इतर दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी पूर्णपणे रद्द करावा.पुढील तीन मिहन्यासाठी राज्य सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रूपये अनुदान जमा करावे. या प्रमुख मागण्या केंद्र व राज्य शासना कडे आमच्या आहे.असे संदीप जगताप यांनी सांगितले. शेतकर्यांच्या दुधाला चांगला भाव मिळणे गरजेचे आहे.असे जि प सदस्य भास्कर भगरे यांनी सांगितले. यावेळेस गावातील दूध संकलन केंद्राचे संचालक सुभाष मातेरे, गणेश संधान, यांचे आभार मानण्यात आले. या अभिषेकाला अनेक शेतकरी उपस्थित होते.
--------------
मथुरपाडेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
मालेगाव : तालुक्यातील मथुरपाडे येथे स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे दूधाचे दर वाढवून मिळावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांतर्फे अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलेल्या आवाहनानुसार मंगळवारी राज्यभर दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. दूधाला आठ रुपये वाढवून भाव मिळावा, शासनाने दूध पावडर आयात बंदी करावी आदी मागण्यांसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी होऊन शनिदेवाला अभिषेक केला व गरीबांसह उपस्थितांना मोफत दूधाचे वाटप करुन शासनाचा निषेध केला.
४आंदोलनात संजय जाधव, अंकुश जगताप, विजय शिंदे, सुकदेव वाकचौरे, पोपट आवारे, डॉ. शरद पवार आदी सहभागी झाले होते. तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ठाकरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
-------------
स्वाभिमानीतर्फे मोफत दूध वाटप
येवला : दुधाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील न्याहारखेडा येथे मोफत दूध वाटप करून अनोखे आंदोलन करण्यात आले. दुधाला अल्प भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दुधाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुध रस्त्यावर न फेकता न्याहारखेडा गावातील गरीबांना मोफत वाटप करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा आंदोलकांच्या वतीने स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे यांनी निषेध केला. आंदोलनात परिसराती दुध ऊत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.
------------
सिन्नरला महादेव मंदिरात पिंडीवर दुधाचा अभिषेक
सिन्नर: पांगरी गावामध्ये सकाळी नऊ वाजता महादेवाच्या मंदिरात पिंडीवर अभिषेक घालून आंदोलनास सुरूवात करण्यात आली. शासनाने १ आॅगस्ट पर्यत दुधाला पाच रूपये लिटर प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा. १ तारखेपर्यत निर्णय नाही झाला तर राज्यव्यापी दूध बंद आंदोलन करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते यांनी गावोगावी आंदोलनची माहीती पोहचवली होती. यावेळी आत्माराम पगार, रवी पगार, कृष्णा घुमरे, बारकु पगार, वसंत पगार, धनंजय निरगुडे, संजय वारूळे, विश्वनाथ पगार, नीलेश पगार, बाळासाहेब कांडेकर, कैलास शिंदे, बाबासाहेब पगार, शांताराम पगार, सुभाष पगार आदी उपस्थित होते़