मेशी येथे दुध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 13:51 IST2020-07-22T13:51:27+5:302020-07-22T13:51:34+5:30
मेशी : येथे अभिनव आंदोलन करत ग्रामदैवत जगदंबा माता मुर्तीस दुधाचा अभिषेक करण्यात आला.

मेशी येथे दुध आंदोलन
मेशी : येथे अभिनव आंदोलन करत ग्रामदैवत जगदंबा माता मुर्तीस दुधाचा अभिषेक करण्यात आला. कोरोनाच्या पाशर््वभूमीवर शेतकरी अतिशय मेटाकुटीस आलेला असताना शेतीस जोडधंदा म्हणून दुध व्यवसाय नावारु पाला आलेला असताना शासनाच्या धोरणामुळे तोही मोडकळीस येईल त्यामुळे संतप्त व्यावसायिकांनी दुध दराबाबत अनोखे आंदोलन केले. यावेळी मेशीचे त्यानंतर उर्वरीत दुध गरिबांना वाटप करण्यात आले. शासनाच्या निषेध म्हणून तलाठी यांना तसेच पोलीसांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी नाशिक जिल्हा ग्रामीण जिल्हाअध्यक्ष राजू शिरसाठ, देवळा तालुका अध्यक्ष तुषार शिरसाठ, देवळा पंचायत समितीचे माजी उपसभापती केदा शिरसाठ, माजी सरपंच बापू जाधव, उपसरपंच भिका बोरसे आदींसह युवक, शेतकरी उपस्थित होते.