झाडीला महिलेचा विनयभंग करून मारहाण; दंगलीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:13 IST2018-10-11T00:13:40+5:302018-10-11T00:13:56+5:30

मालेगाव : तालुक्यातील झाडी शिवारात राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करीत शिवीगाळ व मारहाण केली. तसेच सदर महिलेला बळजबरीने लिंबाच्या झाडाला दोरीने बांधून ठेवले म्हणून संजय सखाराम दुकळे यांच्यासह नऊ जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात विनयभंग व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Milk molested by woman; Riots filed | झाडीला महिलेचा विनयभंग करून मारहाण; दंगलीचा गुन्हा दाखल

झाडीला महिलेचा विनयभंग करून मारहाण; दंगलीचा गुन्हा दाखल

ठळक मुद्देनऊ जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात विनयभंग व दंगलीचा गुन्हा दाखल

मालेगाव : तालुक्यातील झाडी शिवारात राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करीत शिवीगाळ व मारहाण केली. तसेच सदर महिलेला बळजबरीने लिंबाच्या झाडाला दोरीने बांधून ठेवले म्हणून संजय सखाराम दुकळे यांच्यासह नऊ जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात विनयभंग व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे. संजय दुकळे हा घरासमोर शौचास का बसतो, असे बोलल्याचा राग आल्याने साथीदार जमवून पीडित महिलेशी अंगलट केली. तसेच मारहाण करून लिंबाच्या झाडाला बांधून ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक टकले हे करीत आहेत. तसेच या प्रकरणातील संशयीत आरोपी संजय दुकळे यांची पत्नी विमल दुकळे ही शेळी बांधत असताना पीडित महिलेने शेळी बांधु नका अशी कुरापत काढून सीताराम दुकळे यांनी हात धरुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Milk molested by woman; Riots filed