लष्करी अळी नियंत्रण बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 19:32 IST2019-07-09T19:31:34+5:302019-07-09T19:32:04+5:30

खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथे तालुका कृषी विभागामार्फत लष्करी अळी नियंत्रण व व्यवस्थापन सभा सोमवारी (दि.८) पार पडली. खेडलेझुंगे व परिसरातील मका पीकावरील लष्करी अळीवरील नियंत्रण व व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

Military Lily Control Meeting | लष्करी अळी नियंत्रण बैठक

लष्करी अळी नियंत्रण बैठक

ठळक मुद्देनिफाड तालुका कृषी विभाग, बाभुळगांव कृषी महाविद्यालयाचा उपक्रम

खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथे तालुका कृषी विभागामार्फत लष्करी अळी नियंत्रण व व्यवस्थापन सभा सोमवारी (दि.८) पार पडली. खेडलेझुंगे व परिसरातील मका पीकावरील लष्करी अळीवरील नियंत्रण व व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीत मद्रवार यांनी मार्गदर्शन केले की, लष्करी अळी नियंत्रण करण्यासाठी योग्य वेळी काळजी घेतली तर लष्कर अळी नियंत्रणात येईल. घ्यावयाची काळजी सुरवातीला निमअर्क ची पाच टक्के फवारनी करने. एकरी पंधरा ठिकाणी पक्षांना बसण्यासाठी सोय करावी. वेळचे वेळी किटक नाशकाची फवारणी करावी. प्रकादिवे सायंकाळी सात ते दहा या कावधीत लावावे. लष्करी आळीचा सामना चाळीस ते पंचेचाळीस दिवसा पर्यत करणे योग्य आहे. अशा अनेक उपाय योजना यावेळी शेतकऱ्यांना सांगण्यात आल्या.
यावेळी डी. एन. सोमवंशी मंडळ कृषी अधिकारी, के. डी. मद्रवार कृषी पर्यवेक्षक, पी. एस. मोगरे कृषी सहाय्यक, विजय पवार, ए. के. उनवणे यांनी मार्गदर्शन केले. माजी उपसरपंच विजय गिते, शेतकरी नंदकुमार गिते, योगेश साबळे, निलेश घोटेकर, दिलीप सदाफळ आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थीत होते.
 

Web Title: Military Lily Control Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी