लष्करी अळीने ५० टक्के मका पीक बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 03:36 PM2020-06-22T15:36:29+5:302020-06-22T15:36:53+5:30

विठेवाडी : शेतकऱ्याने पिकावर फिरवला रोटर

Military larvae affect 50% of maize crop | लष्करी अळीने ५० टक्के मका पीक बाधित

लष्करी अळीने ५० टक्के मका पीक बाधित

Next
ठळक मुद्देबंहुताश शेतकरी औषध फवारणी करीत असले तरी अळीचा बंदोबस्त होत नसल्यामुळे हजारो रूपये खर्च करूनही उत्पन्नाची शाश्वती राहिलेली नाही.

लोहोणेर : यावर्षी वेळेवर पाउस झाल्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांनी रोहिणी व मृग नक्षत्रात पडलेल्या पावसानंतर मका पिकाची लागवड केली आहे.
परंतु, मक्याच्या रोपांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परिणामी, शेतकरी पिकांवर रोटर फिरवत आहेत.
देवळ्यासह कसमादे परिसरात शेतकरी मक्याची लागवड करतात. गतवर्षी अवकाळी पाऊस व लष्करी अळीने थैमान घातले होते. त्यामुळे ५० टक्के मक्याचे उत्पन्न घटले होते. त्यावेळी दर २२०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे स्थानिक उत्पादकांना फटका बसला व मक्याचे दर ११०० रुपयांपर्यंत खाली घसरले. शासनाने हमी भावाने खरेदी सुरु केली असली तरी पुरेसे बारदाण, वजन काटे, गोडाउन उपलब्ध नसल्याने खरेदी कासव गतीने सुरू आहे. अशाही परिस्थितीत शेतकºयांकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने कसमादे मध्ये मागील पंधर वड्यात ७० ते ८० टक्के शेतक-यांनी मक्याची पेरणी केली आहे. देवळा, कळवण, सटाणा या तालुक्यांमध्ये विठेवाडी, सावकी, खामखेडा, लोहणेर, भऊर, बगडु, परीसरात सर्वत्र मका हे मुख्य खरीप पिक समजुन लागवड झालेली आहे. परतु सुरु वातीच्या काळात सुस्थितीत दिसणारी मक्याची रोपे आता लष्करी अळीने घेरली गेली आहेत. बंहुताश शेतकरी औषध फवारणी करीत असले तरी अळीचा बंदोबस्त होत नसल्यामुळे हजारो रूपये खर्च करूनही उत्पन्नाची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे शेतकरी रोपांवर रोटर फिरवित आहेत. विठेवाडी येथिल प्रगतीशिल शेतकरी माजी सरपंच नंदलाल निकम यांनी चार एकर मका पिकावर रोटर फिरवला. सदर घटना त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांनाही कळविली आहे.

Web Title: Military larvae affect 50% of maize crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक