सिन्नर : तालुक्यातील डुबेरे येथील व सध्या वडगाव सिन्नरच्या ढोकी फाटा परिसरात राहणाऱ्या सविता सुभाष पावसे (४४) व मुलगी साक्षी (१८) यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विहिरीत महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलीसपाटील मीरा पेढेकर यांनी सिन्नर पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. सविता पावसे यांचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. याच विहिरीत त्यांची मुलगी साक्षी हिचा मृतदेह गळाला लागून आला. पोलिसांनी घटनेची आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गंगाराम सारुक्ते तपास करत आहे.
सिन्नरजवळ विहिरीत मायलेकींचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 02:33 IST