मातोरीला मुसळधार पाऊसं

By Admin | Updated: June 3, 2014 23:16 IST2014-06-03T23:02:25+5:302014-06-03T23:16:56+5:30

मातोरी : वादळ वार्‍यासह सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने मातोरीसह पंचक्रोशीतील काही घरांचे छप्पर उडाल्याने शेतकर्‍यांची धावपळ उडाली.

Mighty rain for the female | मातोरीला मुसळधार पाऊसं

मातोरीला मुसळधार पाऊसं

 

मातोरी : वादळ वार्‍यासह सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने मातोरीसह पंचक्रोशीतील काही घरांचे छप्पर उडाल्याने शेतकर्‍यांची धावपळ उडाली. मंगळवारी सायंकाळी तब्बल तासभर चाललेल्या मुसळधार पावसामुळे मातोरीसह दरी, मुंगसरा, धागूर, मखमलाबाद परिसरातील अनेक वृक्ष कोसळले तसेच शेतकर्‍यांच्या शेतांमध्येही तळे साचले होते. अचानक झालेल्या या वादळी पावसाने शेतकर्‍यांसह रस्त्यावरून मार्गक्रमण करणार्‍या वाहनधारकांची चांगलीच धावपळ उडाली. मळे परिसरातील काही घरांचे छप्परही उडाल्याने शेतकर्‍यांची गैरसोय झाली. पंचक्रोशीतील काही घरांमध्येदेखील पाणी शिरल्यामुळे साठविलेले धान्य झाकण्यासाठी शेतकर्‍यांना कसरत करावी लागली. एकीकडे शेतकरी धावपळ करताना दिसत होते, तर बालगोपाळ मात्र घरापुढे साचलेल्या पाण्यात मनसोक्त आनंद लुटत होते. तासभर चाललेल्या पावसाने मळे परिसरातील रस्तोरस्ती पाणी साचले होते. पाणी साचलेल्या रस्त्यातून मार्गक्रमण करताना वाहनधारकांची प्रचंड गैरसोय झाली. (वार्ताहर)

Web Title: Mighty rain for the female

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.