मार्च महिन्याच्या मध्यातच उन्हाचे असह्य चटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 16:55 IST2019-03-19T16:55:05+5:302019-03-19T16:55:27+5:30
सिन्नर : शहरासह तालुक्यात मार्च महिन्याच्या मध्यावरच उन्हाचे असह्य चटके जाणू लागले आहेत. उन्हाच्या झळा असह्य ठरू लागल्याने दुपारनतंर रस्ते ओस पडण्यास सुरूवात झाली आहे.

मार्च महिन्याच्या मध्यातच उन्हाचे असह्य चटके
सिन्नर : शहरासह तालुक्यात मार्च महिन्याच्या मध्यावरच उन्हाचे असह्य चटके जाणू लागले आहेत. उन्हाच्या झळा असह्य ठरू लागल्याने दुपारनतंर रस्ते ओस पडण्यास सुरूवात झाली आहे.
होळीनंतर थंडी गायब होते असा सर्वसाधारण समज असला तरी यंदा ती मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातचे गायब झाल्याचे चित्र आहे. गत आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा असह्य वाटू लागल्या आहेत. सकाळी नऊपासूनच उन्हाचा चटका जाणवण्यास सुरूवात होते. सायंकाळी सहापर्यंत काही प्रमाणात हे चटके जाणवत असल्याचा येत आहेत. दुपारी तर उन्हाच्या झळा नकोशा वाटतात. त्यामुळे नागरिक घर, कार्यालये, आस्थापनांबाहेर पडणे टाळत असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळते आहे.