शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मक्याने ओलंडला अठराशेचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 6:14 PM

एकीकडे सातत्याने ढासळणाºया कांद्याच्या दराने सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना दुसरीकडे शासनाने जाहीर केलेल्या मक्याच्या हमी भावाला डावलून येवला बाजार समितीत मक्याच्या दराने १८०० रूपयांचा टप्पा ओलांडून विक्रम केला असून त्यामुळले शेतकºयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. येवला बाजार समितित मक्याला प्रती क्विंटल किमान १७४२ रूपये कमाल १८०५ रूपये तर सरासरी १७८१ रु पये बाजारभाव मिळाला.

ठळक मुद्देविक्रम : येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा

येवला : एकीकडे सातत्याने ढासळणाºया कांद्याच्या दराने सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना दुसरीकडे शासनाने जाहीर केलेल्या मक्याच्या हमी भावाला डावलून येवला बाजार समितीत मक्याच्या दराने १८०० रूपयांचा टप्पा ओलांडून विक्रम केला असून त्यामुळले शेतकºयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. येवला बाजार समितित मक्याला प्रती क्विंटल किमान १७४२ रूपये कमाल १८०५ रूपये तर सरासरी १७८१ रु पये बाजारभाव मिळाला.शासनाने जाहीर केलेला हमीभाव ओलांडून मकाला थेट अठराच्या अधिक भाव मिळत आहे.या भावामुळे शेतकरी मात्र समाधान व्यक्त करत आहे. कांद्याच्या दराने पदरी निराशा पडली असली तरी मक्याच्या विक्र ीतून कांद्याची तूट भरून निघणार जरी नसली शेतकर्यांना आर्थिक आधार तरी मिळेल अशी चर्चा शेतकरी वर्ग करत आहेत.नाशिक जिल्ह्यासह येवला तालुक्यात दरवर्षी कांदा व कपाशीच्या उत्पादनात शेतकरी अग्रेसर असतात.येवला तालुक्यातील कांदा व कपाशी उत्पादनात मात्र घट झाली असल्याचे दिसून येत आहे. पालखेड आवर्तनातून काहीसा दिलासा मिळाला असला तरी कपाशीला मोठ्या प्रमाणात पाणी द्यावे लागते त्यात विहिरी, बोअरवेल याना पाण्याची कमतरता असल्याने कपाशी उत्पादनात दरवर्षी च्या तुलनेत यंदा घट झाली असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. दुष्काळी तालुक्याला आता आधार म्हणून मकाचा उत्तम पर्याय मिळालाआहे.केवळ १८ हजार ६७४ सर्वसाधारण क्षेत्र असताना त्याच्या दुप्पट म्हणजे ३५ हजार ५९० हेक्टरवर शेतकर्यांनी यंदा मका लावली.मात्र यावर्षी क्षेत्र वाढले पण दरवर्षी जेथे २५ ते ३५ क्विटंल मका पिकवली तेथेच यंदा एकरी सरासरी १० ते १५ क्विटंल उत्पादन निघाले.असे असले तरी दुष्काळामुळे लागवड वाढल्याने मकाचे उत्पादनाची सरासरी टिकून आहे.मका उत्पादक राज्यात घटलेले उत्पादन आण िसद्यस्थितीत पोल्ट्रीसह इतर व्यावसायिकांकडून वाढलेली मागणी यामुळे भावाने विक्र म नोंदवला आहे.काही शेतकर्यांनी हमीभावाने मका विकला असला तरी अनेकांनी मात्र शेती कामांच्या गर्दीत मका साठवून ठेवली होती.आता भाव वाढल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजारात मका विक्र ीला आणत आहेत.दरवर्षी शासनाने जाहीर केलेल्या भावापेक्षा खासगी बाजारात दोनशे ते तीनशे रु पये मकाला कमी दर मिळतो. यावर्षी मात्र शासनाने एक हजार 700 रु पयांचा हमीभाव जाहीर केला असला तरी खाजगी बाजारात मात्र 1 हजार 826 हा उच्चांकी भाव मिळाला आहे. मागील पन्नास वर्षांत मिळाला नसेल इतका उच्चांकी भाव यंदा दुष्काळामुळे शेतकºयांच्या वाट्याला आला असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती