म्हसरुळला सराईत गुन्हेगाराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 01:38 AM2021-11-22T01:38:41+5:302021-11-22T01:39:07+5:30

म्हसरुळ, पंचवटी परिसरात गुंडगिरी करत खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यात संशयित आरोपी असलेल्या पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार प्रवीण गणपत काकड (२८,रा.गुलमोहर कॉलनी, म्हसरुळ) यास अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने भोसकून ठार मारल्याची घटना घडली. रविवारी (दि.२१) रात्री हा खून उघडकीस आला.

Mhasrulla Sarait criminal murder | म्हसरुळला सराईत गुन्हेगाराचा खून

म्हसरुळला सराईत गुन्हेगाराचा खून

googlenewsNext
ठळक मुद्देजामिनावर होता बाहेर : दहा ते बारा गंभीर गुन्ह्यांत सहभाग

नाशिक : म्हसरुळ, पंचवटी परिसरात गुंडगिरी करत खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यात संशयित आरोपी असलेल्या पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार प्रवीण गणपत काकड (२८,रा.गुलमोहर कॉलनी, म्हसरुळ) यास अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने भोसकून ठार मारल्याची घटना घडली. रविवारी (दि.२१) रात्री हा खून उघडकीस आला. घटनास्थळावर पोलिसांना एक ॲक्टीव्हा दुचाकी आढळून आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, प्रवीण काकड हा पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध म्हसरुळ पोलीस ठाण्यात दहा ते बारा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. दिवाळीसाठी प्रवीण हा जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता.

म्हसरुळ-आडगाव लिंकरोडवरील स्मशानभूमीच्या पुढे असलेल्या एका निर्जन मोकळ्या भूखंडावर प्रवीण काकडचा मृतदेह रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गवतामध्ये आढळून आला. घटनेची माहिती मिळताच म्हसरुळ पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृतदेहाचा पंचनामा करत तात्काळ ओळख पटवून जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविला. रात्री उशिरापर्यंत प्रवीण याच्या मारेकऱ्याचा पोलिसांना शोध लागलेला नव्हता. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

--इन्फो--

ओली पार्टी करताना झाला असावा हल्ला

ज्या ठिकाणी प्रवीणचा मृतदेह गवतामध्ये आढळून आला तेथेच पोलिसांना मद्याच्या काही रिकाम्या बाटल्या तसेच मोपेड काळ्या रंगाची दुचाकी आढळून आली आहे. पोलिसांनी दुचाकी जप्त केली असून सुमारे दोन ते तीन संशयितांनी मिळून प्रवीणचा खून केला असल्याची श्यक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. ही दुचाकी प्रवीणने आणली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

Web Title: Mhasrulla Sarait criminal murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.