होमगार्ड कार्यालयातील स्वयंपाकगृहातील धातूची भांडी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 17:11 IST2020-06-26T17:10:47+5:302020-06-26T17:11:29+5:30

तक्रारीत त्यांनी ९ हजार ४५० रूपयांची भांडी चोरून नेल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Metal utensil lamps in the kitchen of the homeguard office | होमगार्ड कार्यालयातील स्वयंपाकगृहातील धातूची भांडी लंपास

होमगार्ड कार्यालयातील स्वयंपाकगृहातील धातूची भांडी लंपास

नाशिक : सीबीएस येथील होमगार्ड कार्यालयातील स्वयंपाक गृहात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे साडेनऊ हजाराचे साहित्य लंपास केल्याची घटना घडली. यामध्ये काही पितळी भांड्यांचाही समावेश आहे.
सीबीएस समोरील जिल्हा होमगार्ड समादेशक कार्यालयात बुधवारी मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून कमांडंट यांच्या कार्यालयासमोरील भांडारगृहाचा कडीकोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. स्वयंपाकासाठी ठेवलेले पितळी धातूचे मोठे भांडे चोारट्यांनी गायब केले. याप्रकरणी जिल्हा समादेशक कार्यालयातील मदन रघुनाथ रावते (रा. शिवाजीनगर ) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्र ार दिली आहे. तक्रारीत त्यांनी ९ हजार ४५० रूपयांची भांडी चोरून नेल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Metal utensil lamps in the kitchen of the homeguard office