रूग्ण आढळल्याने मेशी तीन दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:08 IST2020-07-24T21:30:37+5:302020-07-25T01:08:14+5:30

मेशी : देवळा तालुक्यात कोरोनाचे संक्र मण वाढत आहे. तालुक्यातील देवळा व उमराणे या प्रमुख शहरानंतर आता तालुक्यातील मेशी येथेही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथे ६५ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले.

Messi closed for three days after finding the patient | रूग्ण आढळल्याने मेशी तीन दिवस बंद

रूग्ण आढळल्याने मेशी तीन दिवस बंद

मेशी : देवळा तालुक्यात कोरोनाचे संक्र मण वाढत आहे. तालुक्यातील देवळा व उमराणे या प्रमुख शहरानंतर आता तालुक्यातील मेशी येथेही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथे ६५ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले.
देवळा शहरातही एक ६९ वर्षीय महिलेला व एक ४५ वर्षीय पुरु षाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उमराणें येथील कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णाच्या संपर्कातील अहवाल मात्र निगेटीव्ह आल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला. शुक्रवारी नव्याने ३२ रु ग्णांचे स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तालुक्याची एकूण कोव्हीड रु ग्णांची संख्या आता ४३ पर्यंत गेली आहे. तालुका आणि स्थानिक प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आजपासून मेशीत तीन दिवस स्वयंस्फूर्तीने ग्रामस्थांनी संचारबंदी लागू केली आहे.

Web Title: Messi closed for three days after finding the patient

टॅग्स :Nashikनाशिक