लस न घेता लसीकरणाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 23:55 IST2021-03-17T23:20:24+5:302021-03-17T23:55:00+5:30
नांदगाव : ह्यआज लस शिल्लक नाही...उद्या या...ह्ण असे सांगण्यात आल्याने, १० कि.मी. अंतरावरून घरी परतलेल्या व्यक्तीला काही वेळातच आपले लसीकरण यशस्वी झाल्याचा संदेश मोबाइलवर पाठविला गेल्याने, एका ज्येष्ठ नागरिकाला चक्रावून सोडले. तालुक्यात एकीकडे आरोग्य विभागातच असलेला विसंवाद समोर येत असतानाच, लसीकरण मोहिमेतील असला गलथानपणा उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

त्याचे झाले असे, आठ दिवस आधी नांदगाव येथील ज्येष्ठ नागरिक जयंत कायस्थ यांना नोंदणी ॲपवर हिसवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि. १७ रोजी दुपारी लसीकरणासाठी हजर राहण्याचा संदेश आला. त्याचप्रमाणे, जयंत कायस्थ हिसवळ केंद्रात लस घेण्यासाठी भर उन्हात दुपारी पोहोचले, पण आता लस संपली आहे. उद्या या... असे केंद्रातील डॉक्टरांनी सांगितल्याने ते पुन्हा नांदगावी परतले. मात्र, काही वेळातच ॲपवरून आलेल्या संदेशाने ते हैराण झाले. आपणास कोविशिल्ड लस यशस्वीरीत्या देण्यात आली आहे, असा हा संदेश होता. आधी लस संपली व नंतर लस दिली, या संदेशामुळे कायस्थ व त्यांचे कुटुंबीय चक्रावून गेले. शहरात लसीकरण केंद्र नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना दुसऱ्या गावी असलेल्या केंद्रावर जायला प्रवासाच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या संतोष गुप्ता यांनी नुकतेच तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते. मात्र, त्यानंतरही ज्येष्ठ नागरिकांना हेलपाटा पडत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.