जनजागृती फेरीतून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:20 IST2020-01-11T23:05:54+5:302020-01-12T01:20:29+5:30
स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयात मकरसंक्रांत सणाचे औचित्य साधून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

येवला येथील मुक्तानंद महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीत सहभागी बाळासाहेब रहाणे, धनराज गोस्वामी, सुदाम पातळे, साहेबराव धनवटे, मनोहर पाचोरे, संगीता पांडे, के. के. जाधव, रामभाऊ वडाळकर आदी.
येवला : येथील स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयात मकरसंक्रांत सणाचे औचित्य साधून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
माजी प्राचार्य डॉ. बाळासाहेब रहाणे यांनी पर्यावरण बचावचा नारा देऊन रॅलीचा शुभारंभ केला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्षाचे समन्वयक डॉ. सुदाम पातळे, प्रसिद्धी विभागप्रमुख डॉ. साहेबराव धनवटे, वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. मनोहर पाचोरे, गणित विभागाच्या प्रमुख प्रा. संगीता पांडे, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. के. के. जाधव, प्रा. रामभाऊ वडाळकर, प्रा. बाळू पांढरे, रासेयोचे अधिकारी डॉ. विभांडिक, प्रा. पुरु षोत्तम पाटील, डॉ. विवेक पाटील, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रा. अजय त्रिभुवन आदी उपस्थित होते. प्रा. आर.एन. वडाळकर व प्रा. बी.एस. पांढरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.