शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पारा ४१.१ अंश : उन्हाच्या चटक्याने नाशिककर भाजले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 18:33 IST

गुरूवारी नाशिककर उन्हाच्या तीव्र झळांनी भाजून निघाले. हंगामातील हे सर्वाधिक उच्चांकी तपमान असल्याची नोंद हवामान निरिक्षण केंद्राने केली आहे.

ठळक मुद्देहंगामातील हे सर्वाधिक उच्चांकी तपमान सकाळी आठ वाजेपासून उन्हाच्या झळा असह्य वाटू लागल्या हंगामात पहिल्यांदाच कमाल तपमान ४१ अंशापर्यंत किमान तपमान गुरूवारी २४.२

नाशिक : शहरात उष्णतेचा वाढता कहरामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मागील तीन दिवसांपासून सातत्याने वाढणारे कमाल तपमान गुरूवारी (दि.१०) थेट ४१.१ अंशापर्यंत पोहचल्याने नाशिककर दिवसभर उन्हाच्या चटक्याने भाजून निघाले. हंगामातील हे सर्वाधिक उच्चांकी तपमान असल्याची नोंद हवामान निरिक्षण केंद्राने केली आहे.गुरूवारी नाशिककर उन्हाच्या तीव्र झळांनी भाजून निघाले. सकाळी आठ वाजेपासून उन्हाच्या झळा नाशिककरांना असह्य वाटू लागल्या होत्या. कारण हवेचा वेग पहाटेपासूनच मंदावलेला होता. परिणामी सुर्यकिरणांची प्रखरता अधिक वाढली आणि त्यामुळे दिवसभर नाशिककरांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागला. हंगामात पहिल्यांदाच कमाल तपमान ४१ अंशापर्यंत पोहचल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. दुपारपर्यंत शहरात वाऱ्याचा वेग पुर्णता मंदावलेला होता; मात्र चार वाजेनंतर काहीसा वारा सुरू झाला परंतू त्याचाही फारसा उपयोग वातावरणाला झाला नाही. कारण दुपारनंतर निरभ्र आकाशात काही प्रमाणात ढग दाटण्यास सुरूवात झाली होती. एकूणच अशा विचित्र वातावरणामुळे शहराचे किमान तपमान गुरूवारी २४.२ इतके नोंदविले गेले. किमान तपमान २४ अंशापर्यंत जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. एकूणच नाशिककरांना यामुळे रात्रीही उकाडा अनुभवयास आला.

दिवसभर उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या नागरिकांना रात्री उकाड्याने त्रस्त केले. कारण ढगाळ हवामानामुळे वातावरण फारसे थंड होऊ शकले नाही. सुर्यास्तानंतरही वातावरणात ऊबदारपणा जाणवत होता. रात्रीदेखील वाºयाचा वेग तसा कमीच राहिला. एकूणच उष्णतेचा कहर सध्या सुर्याकडून सुरू आहे. मागील वर्षी १२ मे रोजी कमाल तपमान ४१.२ इतके नोंदविले गेले होते. यावर्षी दोन दिवस अगोदरच कमाल तपमानाचा पारा ४१ अंशावर पोहचल्याने पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये वातावरणाची स्थितीत बदल न झाल्यास तपमान ४१.५ किंवा ४१.८ अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तविली जात आहे.उन्हाचा सलग तडाखानाशिककरांना यावर्षी सलग दोन महिन्यांपासून उन्हाचा तीव्र तडाखा सहन करावा लागत आहे. एप्रिलअखेरपर्यंत उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात जाणवत होती. २७ एप्रिल रोजी ४०.५ इतके उच्चांकी तपमानाची नोंद झाली होती. त्यानंतर मे महिना उजाडताच सुरूवातीचे काही दिवस वारा अधिक चांगला राहिल्यामुळे तपमानाचा पारा कमी होता; मात्र मे च्या दहाव्या दिवशी उच्चांक विक्रमी ४१ अंशापर्यंत तपमान पोहचल्याने नाशिककर भाजून निघाले.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातTemperatureतापमानNashikनाशिकweatherहवामान