Memorial award for Yashwant Rinzed at Ozar | ओझर येथे यशवंत रिंझड यांना स्मृती पुरस्कार प्रदान
ओझर येथे यशवंत रिंझड यांना स्मृती पुरस्कार प्रदान

ओझर : समाज परिवर्तन केंद्राचे कार्याध्यक्ष भरत कावळे यांच्या जाण्याने पाणी वापर क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांनी उभारलेले काम पुढे चालवणे हिच त्यांना श्रध्दांजली ठरेल असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे उपसचिव डॉ संजय बेलसरे यांनी व्यक्त करत वाघाड धरणाचे काम उंचीवर ठेवणे ही त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल अशा भावना व्यक्त केल्या.
कावळे यांच्या द्वितीय स्मृतीदिना निमित्त आयोजित कार्यकर्ता गौरव पुरस्कार सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भरत कावळे यांच्या चळवळीत काम करणारे यशवंत रिंझड यांना स्मृति पुरस्कार देण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी सरपंच तथा ओमको संचालक राजेंद्र शिंदे होते. व्यासपीठावर समाज परिवर्तन केंद्राचे अध्यक्ष डॉ श्रीराम उपाध्ये, वाघाड महासंघाचे शहाजी सोमवंशी, पालखेडचे कार्यकारी अभियंता गोर्वधने, लता कावळे आदि उपस्थित होते.


Web Title: Memorial award for Yashwant Rinzed at Ozar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.