सदस्यांनीच केले ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 16:21 IST2019-06-14T16:21:25+5:302019-06-14T16:21:53+5:30

ढेकू खुर्द : दोघा सदस्यांविरुद्ध तक्रार

Members only encroached on the place of Gram Panchayat | सदस्यांनीच केले ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण

सदस्यांनीच केले ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण

ठळक मुद्देतक्रार करुनही प्रशासनाकडून अद्याप काहीही कार्यवाही न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नांदगाव : नांदगाव तालुक्यातील ढेकु खु. येथील ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांनी ग्रामपंचायतीच्याच जागेवर अतिक्र मण केल्याची तक्रार करण्यात आली असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, ढेकु येथील ग्रामपंचायत सदस्या सरलाबाई वाल्मिक सुर्यवंशी व त्यांचे पती वाल्मिक शहादु सुर्यवंशी यांनी स्वत:च्या मालकीच्या मिळकत क्र मांक १५७चे क्षेत्रफळ ३६० फुट इतके असून त्यांनी राजरस्त्यात ६५ फूट इतके अतिक्र मण करून नागरिकांचा सार्वजनिक वापराचा असलेला रस्ता बंद केला आहे. हे अतिक्र मण काढून नागरिकांना वापरासाठी रस्ता मोकळा करून देणेबाबत येथील माजी सैनिकाच्या मातोश्री रेशमबाई सजनराव सुर्यवंशी यांनी येथील सरपंच/ ग्रामसेवक यांच्या नावाने दि.२२ मार्च २०१९ रोजी अर्ज दाखल केला होता. दुसऱ्या प्रकरणात ग्रामपंचायतीच्या सदस्या वैशाली कांतीलाल राठोड यांचे पती कांतीलाल काळु राठोड हे येथील माजी सरपंच असून त्यांनी शासकीय भूखंडावर अतिक्र मण करून ते सन २००५ पुर्वीचे जुने असल्याचे भासवून सदर जागेवर सिमेंटचे पक्के घराचे बांधकाम केल्याची तक्रार येथील उपसरपंच बळीराम भिमा चव्हाण व इतरांनी अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्याकडे केली आहे. त्यांनी केलेल्या तक्र ारी अर्जासोबत माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार मिळालेल्या माहितीचे कागदपत्रे जोडली असुन, ग्रामपंचायत सदस्या वैशाली कांतीलाल राठोड यांचे पद रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे. तक्रार करुनही प्रशासनाकडून अद्याप काहीही कार्यवाही न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रामपालिकेच्याच सदस्यांनी अतिक्रमण केल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Members only encroached on the place of Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.