सकल नाथपंथी समाज संघटनेचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:23 IST2018-12-17T00:18:27+5:302018-12-17T00:23:49+5:30
सकल नाथपंथी समाज संघटनेच्या विभागीय मेळाव्यात संघटनेचा उद्देश आणि संघटनेची बांधणी या विषयावर चर्चा करण्यात आली.

सकल नाथपंथी समाज संघटनेच्या विभागीय मेळाव्याच्या उद््घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी गोविंद इंगळे, चंद्रकांत देवगुणे, सखाहरी चंद्रहास, प्रा. डॉ. एस. के. जोगी, सुनीता महाले आदी.
आडगाव : सकल नाथपंथी समाज संघटनेच्या विभागीय मेळाव्यात संघटनेचा उद्देश आणि संघटनेची बांधणी या विषयावर चर्चा करण्यात आली. सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेचा अजेंडा मांडण्यात आला. नाशिक विभागातील सकल नाथपंथी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गोविंद इंगळे होते.
अमृतधाम येथील शिवगोरक्ष योगपीठ येथे झालेल्या कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून सकल नाथपंथी समाज संघटनेचे राज्य सचिव चंद्रकांत देवगुणे, सखाहरी चंद्रहास, प्रा. डॉ. एस. के. जोगी, सुनीता महाले आदी उपस्थित होते.
राहुल बोरकर, किशोर लाड यांनी कामाचा आढावा मांडला. अतुल सोनारे, प्रवीण चव्हाण, राहुल रु द्रवंशी, शंतनू शिंदे, ज्ञानेश्वर सोमोसे, मधुकर शिंदे यांनी संयोजन केले. भाऊसाहेब गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. विनायक लाड यांनी प्रास्ताविक केले. माणिक कानडे यांनी आभार मानले.
डॉ. एस. के. जोगी यांनी नाथपंथी समाजाला आजही प्रबोधनाची गरज आहे. समाजाच्या पतपेढी, बँक, शिक्षणसंस्था असावी. वस्ती, गाव, रस्ता, चौक यांनी नवनाथांची नावे दिली जावी. समाजाच्या संप्रदायाची परंपरा, ग्रंथ, उपासना यांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी, असे सांगितले.