सिन्नरला आज अपंगांचा मेळावा
By Admin | Updated: March 8, 2016 00:22 IST2016-03-07T23:11:14+5:302016-03-08T00:22:44+5:30
सिन्नरला आज अपंगांचा मेळावा

सिन्नरला आज अपंगांचा मेळावा
सिन्नर : पंचायत समिती व प्रहार अपंग क्रांती आंदोलन समिती यांच्या वतीने अपंगांसाठी मंगळवारी (दि.८) मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील भिकुसा मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता होणाऱ्या मेळाव्यात आमदार बच्चू कडू मार्गदर्शन करतील. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार माणिक कोकाटे, पंचायत समिती सभापती संगीता काटे, उपसभापती राजेंद्र घुमरे, नगराध्यक्ष आश्विनी देशमुख, पी. यू. पाटील, गटविकास अधिकारी धनंजय जगताप आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध योजनांची माहिती व अर्ज वाटप, अपंग विवाह इच्छूक वधू-वरांची नोंदणी, अपंग महिलांचा महिला दिनानिमित्त सत्कार, प्रहार अपंग क्रांती आंदोलन नामफलकाचे उद्घाटन, गतिमंद मुलांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन सविता जाधव, केशव बिडवे, अरुण पाचोरे, सुदाम भालेराव यांनी केले आहे. (वार्ताहर)