सामाजिक संघटनांच्या वतीने मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:38 IST2018-11-20T00:38:15+5:302018-11-20T00:38:29+5:30

आधार आश्रम घारपुरे घाट येथे अनाथाचे आधार सामाजिक संघटना यांच्या वतीने (दि.१८ ) अनाथ युवा-युवतीचा दिवाळीनिमित्त मेळावा घेण्यात आला.

 Meetings on behalf of social organizations | सामाजिक संघटनांच्या वतीने मेळावा

सामाजिक संघटनांच्या वतीने मेळावा

नाशिक : आधार आश्रम घारपुरे घाट येथे अनाथाचे आधार सामाजिक संघटना यांच्या वतीने (दि.१८ ) अनाथ युवा-युवतीचा दिवाळीनिमित्त मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी मुख्यमंत्री याचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय, महापौर रंजना भानसी उपस्थित होते. याप्रसंगी श्रीकांत भारतीय यांनी मुलांना भावी जीवनाबद्दल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे शासनाच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अभय तेली यांनी मुलांच्या समस्या मांडल्या. तसेच त्याचप्रमाणे समाजातील व्यक्तीचा अनाथाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला पाहिजे, असे मत अमित वासणिक यांनी मनोगत व्यक्त करताना मांडले. कार्यक्रमाला युवा आधार फाउंडेशनचे अध्यक्ष गोरख उबाळे, चिल्डन्स आधार फाउंडेशनच अध्यक्ष अशोक पुजारी, निराधार विद्यार्थी प्रागतिक संस्थेचे अध्यक्ष आनंद निर्मलसह संस्थेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.  अनेक मुलांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे नियोजन सुलक्षणा अहेर यांनी केले. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title:  Meetings on behalf of social organizations

टॅग्स :Nashikनाशिक