येवला पालिका स्थायी समितीची सभा

By Admin | Updated: March 23, 2016 23:29 IST2016-03-23T23:29:25+5:302016-03-23T23:29:57+5:30

येवला पालिका स्थायी समितीची सभा

Meeting of Standing Committee on Yevla Municipality | येवला पालिका स्थायी समितीची सभा

येवला पालिका स्थायी समितीची सभा

येवला : सन २०१६-१७ करिता येवला नगरपालिकेची आठवडे बाजार फी वसुली, दररोज जागा भाडे वसुली, जनावर टोल फी वसुलीचा ठेका देण्यासाठी नगरपालिकेच्या स्थायी समितीसमोर लिलाव करण्यात आला.
बैठकीच्या सुरुवातीला दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने कोणतीही वाढ न करता मागील वर्षाप्रमाणे लिलाव स्वीकारावा, अशी मागणी करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात जेव्हा लिलावास सुरुवात झाली. त्यावेळी लिलावधारकांमध्ये चढाओढ दिसून आली.
मागील वर्षी आठवडे बाजार फी वसुलीचा ठेका १०.४१ लाख रु पयास देण्यात आला होता. तो ठेका यावर्षी १३.३५ लाख रुपयास लिलावात सुनील पांडुरंग जाधव यांनी घेतला. दररोज जागा भाडे वसुलीचा
ठेका मागील वर्षी १०.१९ लाख रुपयास देण्यात आला होता. तो ठेका यावर्षी ११.३६ रुपयास बन्सी शंकर थोरात यांनी घेतला. जनावर टोल फी वसुली मागील वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीने केली होती व त्यासाठी बाजार समितीने नगरपालिकेस ४६ हजार रु पये दिले होते.
यावर्षी मात्र लिलावात यावर्षीचा ठेका ५२ हजार रुपयास अशोक शिवराम सोनवणे यांनी घेतला. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी नगरपालिकेस चांगले उत्पन्न वाढले आहे. (वार्ताहर)



स्थायी समतिीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे हे होते. यावेळी उपनगराध्यक्ष पंकज पारख, स्थायी समतिी सदस्य सागर लोणारी, रजिवान शेख, मुश्ताक शेख, सौ.मीना तडवी उपस्थित होते. मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी सर्व लिलाव धारकास लिलावाची माहिती दिली. व नगरपरिषद कर्मचारी अशोक कोकाटे, अशोक गरु ड यांनी लिलावासाठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केली. (वार्ताहर)

Web Title: Meeting of Standing Committee on Yevla Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.