ग्राहक हक्क चळवळीच्या प्रसारासाठी बैठक

By Admin | Updated: December 9, 2014 01:52 IST2014-12-09T01:52:29+5:302014-12-09T01:52:29+5:30

ग्राहक हक्क चळवळीच्या प्रसारासाठी बैठक

Meeting for promotion of customer rights movement | ग्राहक हक्क चळवळीच्या प्रसारासाठी बैठक

ग्राहक हक्क चळवळीच्या प्रसारासाठी बैठक

नाशिक : ग्राहक हक्क चळवळीच्या प्रसारासाठी बैठक घेणाऱ्या राज्य शासनाच्या ग्राहक कल्याण सल्लागार समिती अध्यक्षांची जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी आपण ‘नागपूरला हिवाळी अधिवेशनात असल्या’चे सांगत दिशाभूल केल्याची बाब समोर आली आहे. पाटील हे नागपूरला नव्हे, तर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असूनही त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे लक्षात येताच संतप्त झालेल्या कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जाच्या अध्यक्षांनी याबाबत आपण थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले. राज्य शासनाच्या ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी सूर्यकांत गवळी यांची नुकतीच नियुक्ती झाली असून, ते ग्राहक तक्रार निवारणासंदर्भात उद्भवणाऱ्या समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी हे राज्यभरात जिल्ह्याच्या ठिकाणी बैठका घेत आहेत.

Web Title: Meeting for promotion of customer rights movement