पिंपळगावी व्यापारी असोसिएशनची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 23:48 IST2020-05-27T21:27:41+5:302020-05-27T23:48:12+5:30
पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये शासनाने अटी-शर्ती घालून काही प्रमाणात सवलत दिल्याने व्यापाऱ्यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याबाबत पिंपळगाव बसवंत शहरात निफाडच्या प्रांत अधिकारी अर्चना पठारे, पिंपळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी असोसिएशनच्या सभासदांची बैठक झाली.

या बैठकीत मंडळ अधिकारी नीलकंठ उगले, चंद्रकांत पंडित, ग्रामसेवक लिंगराज जंगम, सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे आदी उपस्थित होते.
शासन व प्रशासनाने कोरोनाच्या चौथ्या टप्प्यात जी सवलत घालून व्यवसाय सुरू करण्याची मुभा दिली त्याचे पालन कसे करायचे यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. पिंपळगाव शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी मास्क वापरावा व ग्राहकालादेखील मास्क असेल तरच दुकानात येण्याची परवानगी द्यावी, दुकानाबाहेर खरेदी करणाºयांची गर्दी होणार नाही यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग पालनाची काटेकोर अंमलबजावणी करावी. शिवाय दुकानात व दुकानाबाहेर स्वच्छता राखत सुरक्षितता म्हणून व्यावसायिकांकडून हॅण्ड ग्लोज, सॅनिटायझरचा वापर करावा आदी सूचना व्यापारी वर्गाला यावेळी देण्यात आल्या.