येवल्यात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:28 IST2018-04-21T00:28:42+5:302018-04-21T00:28:42+5:30
शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाºयांची बैठक झाली. याप्रसंगी मनसे नेते संजय चित्रे, सरचिटणीस राजाभाऊ चौघुले, प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण मरगज, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, उपजिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पटेल आदी मान्यवरांसह येवला शहर व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

येवल्यात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक
येवला : शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाºयांची बैठक झाली. याप्रसंगी मनसे नेते संजय चित्रे, सरचिटणीस राजाभाऊ चौघुले, प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण मरगज, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, उपजिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पटेल आदी मान्यवरांसह येवला शहर व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मनसे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेश पटेल यांनी स्वागत केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष बळकटीकरण व पक्षाच्या भविष्यातील धोरणांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. स्थानिक पदाधिकाºयांनी मनसेची ध्येयधोरणे समाजात समजावून सांगावी. पक्षाचा विस्तार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी शहर व तालुक्यातील नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात जिल्हा चिटणीसपदी रामदास लासुरे, तालुका अध्यक्षपदी नकुल घागरे, शहराध्यक्षपदी गौरव कांबळे तर शहर संघटकपदी शैलेश कर्पे यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारिणीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर बैठकीत तालुका व शहरातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.