पांडाणेत उमेद अभियानाची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 17:47 IST2019-02-15T17:47:02+5:302019-02-15T17:47:16+5:30
पांडाणे -ग्रामीण भागातील नारी शक्तीने सक्षम होवून ग्रामस्वच्छता व ग्रामसुरक्षा तसेच बचत गटाच्या माध्यमातून जीवन्नोन्नती कशी करावी या साठी आपण स्वत: सक्षम होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ग्रामसंघाची वरिष्ठ वर्धीणी जयश्री बेताल यांनी पांडाणे येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती उमेद अभियानाअंर्तगत पाच दिवसाची कार्यशाळा पांडाणे येथील मारूती मंदिरात सुरू होती. यावेळी सोनाली बघेल , माधुरी खैरनार, पांडाण्यातील पोलीस पाटील शिला गांगुर्डे , तसेच पाच बचत गटातील महिला उपस्थित होत्या. या बचत गटातील महिलांना ग्रामसंघांची बांधणी करणे , महिलांचे संघटन करणे , महिला सक्षमीकरण करणे , गरीबी निर्मुलन करणे तसेच स्वच्छता व आरोग्य या विषय बचत गटातील महींलांना प्रशिक्षण देण्यात आले .या कार्यक्र माला गुरुकृपा स्वयं सहायता बचत गट , श्रीकृष्ण स्वय सहाय्यता बचतगट, रेणूका माता बचत गट , ऊॅ नमो शिवाय बचत गट , व सरस्वती बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.