मालेगावी लोकन्यायालय आयोजनाबाबत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:27 IST2020-01-27T23:15:00+5:302020-01-28T00:27:14+5:30

मालेगाव तालुका विधि सेवा समिती आणि मालेगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ फेब्रुवारी रोजी आयोजित लोकन्यायालय आयोजनाबाबत बैठक घेण्यात पार पडली.

Meeting on Malegavi Lokayukta | मालेगावी लोकन्यायालय आयोजनाबाबत बैठक

मालेगावी लोकन्यायालय आयोजनाबाबत बैठक



मालेगाव : मालेगाव तालुका विधि सेवा समिती आणि मालेगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ फेब्रुवारी रोजी आयोजित लोकन्यायालय आयोजनाबाबत बैठक घेण्यात पार पडली. प्रथम जिल्हा न्यायाधीश आर. एच. मोहंमद अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, न्यायाधीश ए. एस. गांधी, न्यायाधीश कुरूलकर, गटविकास अधिकारी देवरे, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. आर. के. बच्छाव, सचिव किशोर त्रिभुवन उपस्थित होते.
यावेळी आर. एच. मोहंमद यांनी, ८ फेब्रुवारी रोजी आयोजित लोकन्यायालयाची माहिती दिली. तसेच गाव पातळीवरच लहान तंटे मिटविण्याचे आवाहन केले. याशिवाय ज्या तक्रारींमध्ये समझौता होत असेल त्यांनी लोकन्यायालयात येऊन वाद मिटवून घ्यावे. यामुळे लहान केसेसचे प्रमाण निकाली निघून कमी होईल. परिणामी न्यायालयांना मोठ्या केसेसकडे लक्ष देऊन त्वरित निकाली काढण्यास मदत होईल, असे मोहंमद यांनी सांगितले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक घुगे, गटविकास अधिकारी देवरे, पोलीस उपअधीक्षक नवले, न्यायाधीश धेंड, आर. के. बच्छाव यांचीही भाषणे झाली. सामोपचाराने तक्रारी मिटविण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीस सर्व न्यायाधीश, पोलीस अधीक्षक, तंटामुक्तीचे गावपातळीवरील अध्यक्ष, मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


सूत्रसंचालन किशोर त्रिभुवन यांनी केले. आभार अ‍ॅड. मलीक शेख यांनी मानले.

Web Title: Meeting on Malegavi Lokayukta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.