मालेगावी शांतता समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 06:00 PM2020-02-27T18:00:52+5:302020-02-27T18:02:36+5:30

मालेगाव : दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मालेगाव पोलीस प्रशासन सतर्क झाले असून शहरातील पोलीस बंदोबस्त वाढ करण्यात आली आहे. सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व द्वेषपूर्ण व्हीडीओ प्रसारित करुनयेत यासाठी शहरातील विविध व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमीनची अपर पोलीस अधक्षीक संदीप घुगे यांनी पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहात बैठक घेतली.

Meeting of the Malegaon Peace Committee | मालेगावी शांतता समितीची बैठक

मालेगावी शांतता समितीची बैठक

Next

मालेगाव : दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मालेगाव पोलीस प्रशासन सतर्क झाले असून शहरातील पोलीस बंदोबस्त वाढ करण्यात आली आहे. सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व द्वेषपूर्ण व्हीडीओ प्रसारित करुनयेत यासाठी शहरातील विविध व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमीनची अपर पोलीस अधक्षीक संदीप घुगे यांनी पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहात बैठक घेतली.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक घुगे यांनी शहरातील शांतता व एकात्मता कायम राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप चालविताना सामाजिक भान जोपासावे, महत्वाचे व माहितीपूर्णच मॅसेज प्रसारीत करावे, समाजात तेढ निर्माण निर्माण होणार नाही असे व्हीडीओ टाकू नये, ज्या ग्रुपवर असे व्हीडीओ प्रसारीत होतील त्या ग्रुपच्या अ‍ॅडमीनवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. बैठकीला पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण व शहरातील व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपचे अ‍ॅडमीन उपस्थित होते.
दरम्यान गुरुवारी शांतता व एकात्मता समितीच्या सदस्यांची बैठक पार पडली. दिल्ली येथील घटनेनंतर शहरात कायदा व सुव्यवस्था टिकवून रहावी, शहरातील शांतता व एकात्मतेला बाधा पोहचू नये यासाठी पोलीसांनी सहकार्य करावे असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक घुगे यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले. यावेळी सदस्यांनी विविध सूचना केल्या.

Web Title: Meeting of the Malegaon Peace Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस