कळवण पंचायत समितीची सभा
By Admin | Updated: December 2, 2015 23:07 IST2015-12-02T23:03:57+5:302015-12-02T23:07:05+5:30
गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बदलीचा ठराव

कळवण पंचायत समितीची सभा
कळवण : चाळीसगावच्या गणवेश घोटाळ्यातील संशयित गटशिक्षण अधिकारी बी. टी. पाटील यांच्या बदलीची मागणी बागलाण पंचायत समितीच्या सदस्यांनी लावून धरली असताना अशा गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे असलेला कळवण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा पदभार काढून घ्यावा, असा ठराव कळवण पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला.
बागलाण पंचायत समितीच्या सभेत पाटील चाळीसगाव तालुक्यात गटशिक्षण अधिकारी असताना गणवेश घोटाळ्यात त्यांची चौकशी झाली होती. त्यात ते दोषी आढळल्याने त्यांची बदली करण्यात आली. चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी ते वर्षगैरहजर होते. असे असताना अशा अधिकाऱ्यांकडे कळवणचा पदभार देऊन जिल्हा परिषदेच्या प्रशासन व शिक्षण विभागाने काय साधले, असा सवाल कळवण पंचायत समितीचे उपसभापती अॅड. संजय पवार यांनी केला आहे. कळवणचा अतिरिक्त पदभार तत्काळ काढून घ्यावा, असा ठराव कळवण पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला आहे.