समता शिक्षक परिषदेची जिल्हा कार्यकारिणीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 00:24 IST2021-06-13T23:24:14+5:302021-06-14T00:24:54+5:30

दिंडोरी : महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेची जिल्हा कार्यकारिणीची बैठक रामवाडी, नाशिक येथे महात्मा फुले, डॉ. आंबेडकर मागासवर्गीय शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड होते.

Meeting of District Executive of Samata Shikshak Parishad | समता शिक्षक परिषदेची जिल्हा कार्यकारिणीची बैठक

समता शिक्षक परिषदेची जिल्हा कार्यकारिणीची बैठक

ठळक मुद्देविविध विषयांवर चर्चा : गायकवाड यांनी स्वीकारला पदभार

दिंडोरी : महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेची जिल्हा कार्यकारिणीची बैठक रामवाडी, नाशिक येथे महात्मा फुले, डॉ. आंबेडकर मागासवर्गीय शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड होते.

यावेळी मावळते जिल्हाध्यक्ष उत्तमराव केदारे यांनी पदभार चंद्रकांत गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केला, तसेच उत्तमराव केदारे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. बैठकीत संघटनेच्या पुढील वाटचालीबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत संघटनेची तालुका कार्यकारिणी पुनर्गठित करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.

तसेच संघटनेची श्रमिक संघाकडे नोंदणी करण्यासाठी राज्य शाखेच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे ठरले. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात कोरोना कालावधीत शिक्षकांनी प्रशासनास सहकार्य करून अधिकाधिक विद्यार्थिभिमुख उपक्रम राबवावेत, असे आवाहन करण्यात आले. सरचिटणीस संजय पगारे यांनी प्रास्ताविक केले. सदर बैठकीस जिल्हा कोषाध्यक्ष नवनाथ आढाव, प्रकाश खरे, कार्याध्यक्ष विजय जगताप, वाल्मीक कापडणे, देवेंद्र वाघ, अनंत बिऱ्हाडे, कैलास शिंदे, प्रल्हाद पवार अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.


महासंघ स्थापनेच्या हालचाली
जिल्हाभरातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांचा महासंघ तयार करून पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात आक्रमक पवित्रा घेण्याचे सूतोवाच बैठकीतील पदाधिकाऱ्यांनी केले. शिक्षकांचे मासिक वेतन, वैद्यकीय बिलांची परिपूर्ती व भविष्य निर्वाह निधी प्रलंबित या विषयांवर चर्चा करून प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात लवकरच शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Meeting of District Executive of Samata Shikshak Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.