विश्वकर्मा जयंतीनिमित्त देवळालीत मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:02 IST2020-02-07T23:03:42+5:302020-02-08T00:02:18+5:30
देवळालीगाव येथे भगवान श्री विश्वकर्मा लोहार समाज जयंती उत्सव मंडाळाच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त श्री विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

देवळालीगाव येथे भगवान श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त प्रतिमापूजनप्रसंगी माजी आमदार योगेश घोलप. समवेत नगरसेवक सूर्यकांत लवटे, जगदीश पवार, विकास गिते, गणेश बनकर, विक्र ात थोरात, स्वप्नील लवटे, गणेश काळे, रमेश मकवान, सचिन काळे, अरु ण मकवान, राजेंद्र काळे, विकास मोगडे, प्रमोद मकवान, मनोज काळे, ईश्वर काळे आदी.
नाशिकरोड : देवळालीगाव येथे भगवान श्री विश्वकर्मा लोहार समाज जयंती उत्सव मंडाळाच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त श्री विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
भगवान श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त शुक्रवारी सकाळी श्री विठ्ठल मंदिरात मांडव डहाळे, भगवान श्री विश्वकर्मा देवतेस अभिषेक, महापूजा, सत्यनारायण पूजन करण्यात आले. त्यानंतर परिसरातून एका वाहनावर भगवान श्री विश्वकर्मा यांची प्रतिमा ठेवून परिसरातून मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. देवळालीगाव गांधी पुतळा येथे शिवसेनेच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी आमदार योगेश घोलप, नगरसेवक सूर्यकांत लवटे, जगदीश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रमेश मकवान, सचिन काळे, अरुण मकवान, राजेंद्र काळे, विकास मोगडे, प्रमोद मकवान, मनोज काळे, ईश्वर काळे, श्रीधर मकवान, किरण डहाळे, चंद्रकांत महानुभव, विकास आदींसह समाजबांधव उपस्थित होते.