शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला संमेलन मिळाल्यास यशस्वी करण्याचा सभेत केला निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 01:36 IST

कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदाचे ९४वे साहित्य संमेलन नियंत्रित स्वरूपात होणार असले, तरी त्यासाठी  लोकहितवादी मंडळाने प्रस्ताव दिलेला असून, साहित्य महामंडळाकडून संमेलन नाशिकला मिळाल्यास, ते यशस्वी करण्याचा निर्धार लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर आणि सर्व सभासदांनी व्यक्त केला. 

नाशिक : कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदाचे ९४वे साहित्य संमेलन नियंत्रित स्वरूपात होणार असले, तरी त्यासाठी  लोकहितवादी मंडळाने प्रस्ताव दिलेला असून, साहित्य महामंडळाकडून संमेलन नाशिकला मिळाल्यास, ते यशस्वी करण्याचा निर्धार लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर आणि सर्व सभासदांनी व्यक्त केला. लोकहितवादी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी कुसुमाग्रज स्मारकात पार पडली. १० वाजता गणपूर्तीअभावी तहकूब करण्यात आलेल्या सभेला १०.३० वाजता प्रारंभ झाला. यावेळी इतिवृत्त मंजुरीसह विषयपत्रिकेवरील २०-२१च्या अंदाजपत्रकाचा विषय वगळता अन्य सर्व विषयांना मंजुरी  मिळाली. यावेळी बोलताना अध्यक्ष जातेगावकर यांनी राज्य साहित्य महामंडळाकडे प्रस्ताव दिलेला असून,  महामंडळाची समिती ७ जानेवारीला स्थळपाहणी करण्यास येणार  असल्याचे सांगितले. त्या समितीच्या स्थळपाहणीनंतरच्या आठवडाभरात साहित्य संमेलन नाशिकला होणार की नाही, ते निश्चित होणार आहे, तसेच महामंडळाला हे थोड्या नियंत्रित स्वरूपातील संमेलन मार्चअखेरपर्यंतच घ्यायचे असल्याने निर्णयानंतरच्या तयारीसाठी केवळ दोन महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. मात्र, प्रस्ताव जरी लोकहितवादी मंडळाने दिला असला, तरी हे संमेलन नाशिककरांचे असेल. त्यामुळे संमेलन यशस्वी झाले तरी नाशिकचे नाव होणार असून, त्रुटी राहिल्या, तरी गावाच्या नावावर जाणार असल्याने, सर्व नाशिककरांनी मिळून संमेलन यशस्वी करण्याचा  निर्धार असल्याचे जातेगावकर यांनी नमूद केले, तसेच लोकहितवादी मंडळाचे ज्योतीकलश सभागृह हे मनपाने ताब्यात घेतलेले असले, तरी त्याबाबत संस्थेचे विश्वस्त आणि माजी आमदार हेमंत टकले हे आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे जातेगावकर यांनी नमूद केले. विषयपत्रिकेचे वाचन सुभाष पाटील यांनी केले.  किरण समेळ यांनी अंदाजपत्रक मांडले. मुकुंद कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी ऐन वेळच्या विषयात श्रीकांत बेणी यांनी ज्योतीकलश सभागृह पुन्हा मंडळाला मिळावे, यासाठी काय प्रयास झाले, त्याबाबतची माहिती द्यावी, असे सांगितले, तसेच संमेलन नाशिकला झाल्यास त्यातून मंडळालाही आर्थिक बळ मिळू शकेल, असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर सुभाष पाटील, दिलीप साळवेकर, भगवान हिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. अंदाजपत्रकासाठी बोलावणार विशेष सभा यंदाच्या वर्षीचे साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित होण्यास आठवडाभराहून अधिक कालावधी लागणार आहे. त्यामुळे संमेलन नाशिकला मिळाल्यास त्याबाबतच्या प्रस्तावित खर्चाचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे आताच्या सभेत यंदाच्या २०-२१च्या अंदाजपत्रकाच्या मंजुरीचे काम पुढे ढकलण्यात आले, तसेच आवश्यकतेनुसार पुढील पंधरवड्यात त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचा निर्णयही अध्यक्षांनी जाहीर केला. 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक