चांदवड तालुका समता परिषदेची बैठक
By Admin | Updated: January 12, 2016 22:40 IST2016-01-12T22:28:04+5:302016-01-12T22:40:03+5:30
चांदवड तालुका समता परिषदेची बैठक

चांदवड तालुका समता परिषदेची बैठक
चांदवड : तालुका समता परिषदेची बैठक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी तालुकाध्यक्ष यू. के. अहेर, जिल्हा पदाधिकारी रघुनाथ अहेर, नंदकुमार मंडलिक, शांताराम गांगुर्डे, नगरसेवक देवीदास शेलार, जिल्हा परिषद सदस्य विलास माळी, कादवाचे संचालक सुखदेव जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रकाश शेळके, सुभाष शेलार आदि मान्यवर उपस्थित होते. बाळासाहेब कर्डक यांनी आपल्या भाषणात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केलेले आरोप तथ्यहीन असल्याचे सांगितले. यावेळी यू. के. अहेर, रघुनाथ अहेर, प्रकाश शेळके यांची भाषणे झालीत. बैठकीत नगरसेवक देवीदास ऊर्फ राजेंद्र शेलार यांचा बाळासाहेब कर्डक यांच्या हस्ते करण्यात आला.
बैठकीस किशोर शेलार, बाळासाहेब पाटील, देवीदास शेलार, युवराज अहेर, डॉ. त्र्यंबक सोनवणे, सुनील क्षीरसागर, विनोद क्षीरसागर, बाळू जाधव, सचिन सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, अंबादास ठोंबरे, कैलास पवार, ज्ञानेश्वर पगार, भाऊसाहेब जाधव, नवनाथ पवार, अशोक सोनवणे, विठ्ठल पगार, कैलास खैरे उपस्थित होते. (वार्ताहर)