सिन्नर नगरपरिषदेत बर्ड फ्लूबाबत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 18:10 IST2021-01-13T18:09:44+5:302021-01-13T18:10:27+5:30
सिन्नर : राज्यात बर्ड फ्लूचा वेगाने प्रसार होत असल्याने सिन्नर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांनी त्यांच्या कक्षात चिकन विक्रेत्यांसोबत बैठक घेतली. बैठकीत शहराच्या हद्दीत असलेल्या चिकन शॉपची माहिती घेण्यात आली. त्यानंतर आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.

सिन्नर नगरपरिषदेत बर्ड फ्लूबाबत बैठक
चिकन विक्री दुकानावर स्वच्छता असली पाहिजे, फ्रेश चिकन दिले पाहिजे, तालुक्याबाहेरील पक्षी शहरात आणू नयेत, तालुक्यातील किंवा शहरातीलच पक्षी चिकन विक्रीसाठी आणावेत आदी सूचना देण्यात आल्या. बैठकीस उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख, ताहीर शेख तसेच शहरातील चिकन विक्रेते अध्यक्ष कन्हया धनगर, जावेद मोमीन, शकील शेख, कामील शेख, साहील शेख, जुबेर कोथमिरे, अझहर शेख, वसीम मणियार, तौफिक पठाण, तैब चिकन सेंटर, आरजू चिकन, गणेश बागडे आदी उपस्थित होते.