अभिनेते सयाजी शिंदे यांची एकलहरे केंद्रास भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:17 IST2019-08-28T00:16:49+5:302019-08-28T00:17:24+5:30
सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रास भेट देऊन पाहणी केली व वीज निर्मितीची प्रक्रिया समजावून घेतली.

अभिनेते सयाजी शिंदे यांची एकलहरे केंद्रास भेट
एकलहरे : सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रास भेट देऊन पाहणी केली व वीज निर्मितीची प्रक्रिया समजावून घेतली.
सयाजी शिंदे यांनी वीज निर्मिती केंद्रातील विविध विभागांना भेटी देऊन, वीज निर्मिती कशी होते याची माहिती घेतली. त्यानंतर कर्मचाऱ्यांशी हितगुज साधताना ते म्हणाले की, दहा मिनिटे वीज गेली तरी जनता अस्वस्थ होते. ती तयार करण्यासाठी किती कष्ट घेतले जातात, ते मात्र जनतेला कळत नाही. त्यामुळे वीज तयार करणे कठीण काम असल्याने विजेची बचत प्रत्येकाने केली पाहिजे.
यावेळी उपमुख्य अभियंता मोहन आव्हाड, राकेश कमटमकर, मनोहर तायडे, शशांक चव्हाण, निवृत्ती चाफळकर, सूर्यकांत पवार आदी उपस्थित होते.
श्ािंदे यांनी पीस पार्क, कॉन्ट्रेक्टर गार्डन आणि मुख्य अभियंता यांच्या निवासस्थानी असलेल्या बागेची, वेगवेगळ्या झाडांचीही त्यांनी पहाणी करून विविधता जाणून घेतली. वीज निर्मिती करताना पर्यावरण, वृक्षप्रेम, जलसंवर्धन, वीज बचतीची संकल्पना मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांनी विशद केली.