नाशिक : महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.१०) सकाळी ९ वाजता गंगापूररोडवरील चोपडा बॅँक्वेट हॉलमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नाशिक दौºयावर आलेल्या राज ठाकरे यांच्या होणाºया मेळाव्याकडे लक्ष लागून आहे.मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे गुरुवारी (दि.९) रात्री ८ वाजता गोल्फ क्लबवरील शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी राज यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी डॉ. प्रदीप पवार, मनसेचे गटनेता सलीम शेख, माजी गटनेता अनिल मटाले, नगरसेवक योगेश शेवरे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते. शुक्रवारी (दि.१०) राज यांच्या उपस्थितीत सकाळी मनसेच्या पाचही नगरसेवकांची बैठक होणार असून, त्यानंतर राज ठाकरे हे समृद्धी महामार्गामुळे बाधित होणाºया शेतकºयांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर सकाळी ९ वाजता गंगापूररोडवरील चोपडा बॅँक्वेट हॉल येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:59 IST
महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.१०) सकाळी ९ वाजता गंगापूररोडवरील चोपडा बॅँक्वेट हॉलमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मेळावा
ठळक मुद्दे निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नाशिक दौºयावर राज ठाकरे यांचे आगमन मनसेच्या पाचही नगरसेवकांची बैठक