मेडिकल दुकाने राहिले बंद
By Admin | Updated: May 31, 2017 01:04 IST2017-05-31T01:04:10+5:302017-05-31T01:04:21+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : दीड हजार केमिस्ट सहभागी

मेडिकल दुकाने राहिले बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून आॅनलाइन औषधविक्री व ई-पोर्टलबाबत शासनाचे सकारात्मक धोरणाविरोधात अखिल भारतीय औषधीविक्रेता संघटनेने बारा तासांचा देशव्यापी बंद पुकारला होता. या बंदमध्ये शहरातील सुमारे दीड हजार तर जिल्ह्यातील सुमारे पाच हजार केमिस्ट सहभागी झाले होते, असा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
‘अखिल भारतीय औषधी विक्रेता बंद’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ‘नाशिक केमिस्ट असोसिएशन’नेदेखील बंद यशस्वी करण्यासाठी शहरासह जिल्ह्यात प्रयत्न केला. आपत्कालीन ५० कॉलदेशव्यापी बंदमुळे शहरातील सर्व मेडिकल बंद राहिल्याने अशा गरजू रुग्णांसाठी औषधांच्या मागणीचे आपत्कालीन परिस्थितीत संघटनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर सातपूर, सिडको, नाशिकरोड, अशोकस्तंभ परिसरातून सुमारे ५० कॉल आले. यावेळी संघटनेच्या वतीने काही औषधविक्रेत्यांच्या माध्यमातून संबंधित गरजू रुग्णांच्या नातेवाइकांना औषधे उपलब्ध करून दिले. गोळे कॉलनीत चार ते पाच औषधविक्रेत्यांना आपत्कालीन परिस्थितीत औषधे पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली होती.