वैद्यकीय अधिकाऱ्याचे महामार्गावर हृदयविकाराने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:15 IST2020-02-20T00:08:54+5:302020-02-20T00:15:18+5:30
ब्राम्हणगाव वनस येथील रहिवासी व अभोणा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश बाळासाहेब शिंदे (३८) यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले.

वैद्यकीय अधिकाऱ्याचे महामार्गावर हृदयविकाराने निधन
नैताळे : ब्राम्हणगाव वनस येथील रहिवासी व अभोणा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश बाळासाहेब शिंदे (३८) यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले.
डॉ. शिंदे हे स्विफ्ट गाडीने नाशिककडे येत असताना नांदूर नाका ते जत्रा हॉटेल दरम्यान बांबूज हॉटेलजवळ त्यांना छातीत वेदना होऊ लागल्या. प्रसंगावधान राखत त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर ते गाडीत मृतावस्थेत आढळून आले. बुधवारी सकाळी ब्राम्हणगाव (वनस) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, सहा वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.