कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात प्रशासनाकडून उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:02 IST2020-08-12T22:46:44+5:302020-08-13T00:02:36+5:30

पेठ : तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेवखंडी येथे कोरोनाबाधित आढळून आल्याने तालुका व ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ उपाययोजना सुरू केल्या असून, प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून कोरोना प्रतिबंधक आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.

Measures from the administration in the Corona Restricted Area | कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात प्रशासनाकडून उपाययोजना

कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात प्रशासनाकडून उपाययोजना

ठळक मुद्देप्रतिबंधित क्षेत्रात उपाययोजना करून गावात फवारणी

पेठ : तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेवखंडी येथे कोरोनाबाधित आढळून आल्याने तालुका व ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ उपाययोजना सुरू केल्या असून, प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून कोरोना प्रतिबंधक आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.
पेठचे तहसीलदार संदीप भोसले, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित भुसावरे, विस्तार अधिकारी बाळू पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील, हरसूल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी शेवखंडी येथे भेट दिली. योग्य खबरदारी घेऊन बाधित रुग्णाच्या घराचा परिसर व प्रतिबंधित क्षेत्रात उपाययोजना करून गावात फवारणी करण्यात असल्याची माहिती ग्रामसेवक दुर्गादास बोसारे यांनी दिली. आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आलीे. कुळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत शेवखंडी परिसरात वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्य-सेवक, आशा कर्मचारी, सरपंच हरिभाऊ लहारे, पोलीसपाटील उत्तम चौधरी, अंबादास भुसारे, ग्रामसेवक दुर्गादास बोसारे तसेच हरसूल पोलीस स्टेशनचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत.शेवखंडी येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाइकांची उपासमार होऊ नये यासाठी संवेदनशील भावनेतून मुख्याध्यापक तसेच ग्रामसेवक यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून प्रतिबंधित क्षेत्रातील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सोशल डिस्टन्स ठेवत माजी पं. स. सभापती मनोहर चौधरी, डॉ. कोठारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे.

Web Title: Measures from the administration in the Corona Restricted Area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.