आमदारांनी घेतले विद्यार्थ्यांसोबत भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 01:31 IST2018-06-29T01:30:14+5:302018-06-29T01:31:02+5:30

दिंडोरी : तालुक्यातील चिंचखेड येथील जिल्हा परिषद शाळेला दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी सदिच्छा भेट दिली. विद्यार्थ्यांंची चाचणी घेऊन समाधान व्यक्त केले. तसेचविद्यार्थ्यांंसोबत पोषण आहाराचा आस्वाद घेतला.

Meals with MLAs taken by MLAs | आमदारांनी घेतले विद्यार्थ्यांसोबत भोजन

आमदारांनी घेतले विद्यार्थ्यांसोबत भोजन

दिंडोरी : तालुक्यातील चिंचखेड येथील जिल्हा परिषद शाळेला दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी सदिच्छा भेट दिली. विद्यार्थ्यांंची चाचणी घेऊन समाधान व्यक्त केले. तसेचविद्यार्थ्यांंसोबत पोषण आहाराचा आस्वाद घेतला. शाळेचे मुख्याध्यापक संजय चौधरी यांनी शाल श्रीफळ देऊन आमदार नरहरी झिरवाळ यांचा सत्कार केला. इंग्रजी शाळे मधील मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाली आहेत, हेच खरे तुमचे मोठे यश आहे ,असे म्हणून झिरवाळ यांनी शिक्षकांचे कौतुक केले. त्यावेळी मनोहर देसले, राठोड,शिंगणे, कोंडावार, तसेच सर्व शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Meals with MLAs taken by MLAs

टॅग्स :Schoolशाळा