मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

By प्रसाद गो.जोशी | Published: May 19, 2024 04:41 PM2024-05-19T16:41:53+5:302024-05-19T16:44:10+5:30

संशयितांकडून एक लाख रुपये किंमतीची एमडी पावडर जप्त करण्यात आली.

MD powder worth 1 lakh seized from school premises in Malegaon | मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

चंद्रकांत सोनार

मालेगाव : शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक लाख रुपये किंमतीची ६.६८ ग्रॅम एमडी वडर जप्त केली. पोलिसांनी या प्रकरणी तिघा संशयितांना अटक केली आहे. शहरातील काही संशयितांनी एमडी पावडर विक्री व वापरासाठी आणल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांना मिळाली. 

शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल पठारे, हवालदार ठाकूर, पोलिस शिपाई काळे, दिनेश शेरावते व डोंगरे यांनी सापळा रचला असता शहरात पुन्हा शहरातील न्युन्सिपल हायस्कुल आवारात मोहम्मद जुनेद साबीर (रा. आझादनगर), मोहम्मद जुनेद चाऊस उर्फ डोंग्या व सदरुद्दीन जलालुद्दीन काझी उर्फ कल्लू (दोघे रा. निहालनगर) या तिघा संशयितांकडून एक लाख रुपये किंमतीची एमडी पावडर जप्त करण्यात आली. तिघा जणांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: MD powder worth 1 lakh seized from school premises in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.