नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएएच-एमबीए/ एमएमएस-सीईटी १४ व १५ मार्चला तर एमएएच-एमसीए-सीईटी- २०२० प्रवेश परीक्षा २८ मार्चला ऑनलाइन पद्धतीने होणार असून महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. एमएएच-एमबीए/एमएमएस-सीईटी- २०२० ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दि. १० जानेवारीपासून प्रक्रिया सुरू असून, या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत आहे. तर एमएएच- एमसीए- सीईटी २८ मार्चला होणार असून, या प्रवेश परीक्षेसाठी दि.१५ जानेवारीपासून आॅनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून, इच्छुक विद्यार्थ्यांना २२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे करण्यात आले आहे. या ऑनलाइन परीक्षांचे वेळापत्रक व माहितीपुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे इंजिनियरिंग, बी. टेक, बी. फार्मसी, फार्म डी, कृषी पदवी, मत्स्यशास्त्र, दुग्ध तंत्रज्ञान आदी अभ्यासक्रमांसाठी १३ ते १७ एप्रिल व २० ते २३ एप्रिल २०२० या कालावधीत एमएचटी सीईटी परीक्षा होणार आहे. एमएससी, हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी पदवी, स्थापत्य पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी १० मे व हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी १६ मे रोजी प्रवेशपरीक्षा होणार असल्याची माहिती राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तारखांची पूर्वकल्पना यावी, यासाठी सीईटी सेलकडून उच्च शिक्षणाच्या आठ व्यावसायिक आणि तंत्रशिक्षणाच्या सहा अभ्यासक्रमांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.
एमबीएसाठी १४ व १५ मार्चला तर २८ मार्चला एमसीएसाठी सीईटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 18:56 IST
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएएच-एमबीए/ एमएमएस-सीईटी १४ व १५ मार्चला तर एमएएच-एमसीए-सीईटी- २०२० प्रवेश परीक्षा २८ मार्चला ऑनलाइन पद्धतीने होणार असून महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
एमबीएसाठी १४ व १५ मार्चला तर २८ मार्चला एमसीएसाठी सीईटी
ठळक मुद्देएमबीएसाठी १४ व १५ मार्चला सीईटी, १५ फेब्रुवारीपर्यंत अर्जाची मुदतएमसीएसाठी २८ मार्चला सीईटी, २२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची संधी