शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

आगामी निवडणुकांत महिलांना जास्तीत जास्त संधी - रोहिणी खडसे

By दिनेश पाठक | Published: January 20, 2024 6:24 PM

केंद्रीय तपास संस्था फक्त विरोधकांनाच त्रास देत असल्याची टीका त्यांनी मोदी सरकारवर केली.

नाशिक : शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली असून जनतेच्या मनात आमचाच मुळ राष्ट्रवादी पक्ष आहे. कोणाचे विचार बदलले म्हणून संपूर्ण पक्ष बदलत नसतो. महिलाविषयक धोरण प्रथम शरद पवार यांनीच आणले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये देखील महिलांना जास्तीत जास्त प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा राेहिणी खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रीय तपास संस्था फक्त विरोधकांनाच त्रास देत असल्याची टीका त्यांनी मोदी सरकारवर केली. महिला आघाडीच्या नियुक्त्या तसेच हळदी कुंकु समारंभासाठी खडसे शहरात आल्या होत्या. सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.त्या म्हणाल्या की, महिला संघटन आमचे ध्येय आहे. कोणी पक्षातून बाहेर पडले म्हणजे पक्ष संपत नाही. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत अजून स्थान मिळत नसल्याबद्दल विचारले असता प्रकाश आंबेडकर आमच्यासोबतच असतील, असा विश्वास त्यांनी दर्शविला. भाजपाने दबावतंत्राच्या माध्यमातून विरोधकांच्या चौकशा लावल्या आहेत, परंतू आम्ही घाबरणारे नाही. चौकशीत काहीच निष्पन्न होत नसताना फक्त घाबरविण्यासाठी अथवा भाजपात येण्यासाठी केंद्रीय तपास संस्थांचा दुरपयोग केला जात आहे. युवतींना पक्षाशी जोडण्याचे काम जोमाने होत असून त्यास राज्यभरात प्रतिसाद मिळत असल्याचे राेहिणी खडसे यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ओबीसींच्या आरक्षणास धक्का न लागता मराठा समाजास आरक्षण मिळाले पाहीजे, अशी भूमिका त्यांनी विषद केली. पत्रकार परिषेस माजी आमदार दिपीका चव्हाण, महिला आघाडी शहर जिल्हाध्यक्षा अनिता दामले, शहर उपाध्यक्षा कविता पवार, सरला नाडे, ओबीसी सेलचे छबु नागरे, सरचिटणीस मुन्ना अन्सारी, प्रवीण नागरे उपस्थित हाेते.राम मंदिर उदघाटनाची घाई राम मंदिराबाबतच्या प्रश्नावर राेहिणी खडसे यांनी भाजपावर संधान साधले. हा सोहळा भाजपाने फक्त इव्हेंटपुरताच केला असल्याची टिका केली. राम मंदिराचे काम हाेत असल्याचा गर्व आम्हालाही आहेच. माझे वडील एकनाथ खडसे कारसेवक होते. राम मंदिर हा विषय अस्मितेचा आहे. आम्हीही रामाच्या दर्शनासाठी अयोद्धेला जाणार आहोत. परंतु मंदिराचे काम अजून ५० टक्क्याच्यावर बाकी असताना उदघाटनाची घाई होत असल्याची टिका त्यांनी केली.

टॅग्स :Rohini Khadseरोहिणी खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस