माउलीची माया होता माझा भीमराया...

By Admin | Updated: December 6, 2015 22:08 IST2015-12-06T22:08:20+5:302015-12-06T22:08:57+5:30

महापरिनिर्वाण दिन : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी गर्दी; ठिकठिकाणी महामानवास अभिवादन

Mauli's maya was my bhumaraya ... | माउलीची माया होता माझा भीमराया...

माउलीची माया होता माझा भीमराया...

नाशिक :
चांदण्याची छाया कापराची काया
माउलीची माया होता माझा भीमराया....
चोचीतला चारा देत होता सारा
आईचा उबारा देत होता सारा
भीमाईपरी चिल्यापिल्यावरी
पंख पांघराया होता माझा भीमराया....

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध सामाजिक संस्था, संघटना, पक्षांच्या वतीने नाशिक शहर परिसरात अभिवादन करण्यात आले. शहरातील शिवाजी रोडवरील डॉ. आंबेडकर पुतळा तसेच नाशिकरोड येथील रेल्वेस्थानकासमोरील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी परिसरातील हजारो भीमबांधव मध्यरात्री एकत्र आले होते. पुतळ्यासमोर मेणबत्ती प्रज्वलित करून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
नाशिकरोड, देवळालीगाव, विहितगाव, चेहेडी, एकलहरे, जेलरोड, दसक, पंचक आदि ठिकाणी प्रतिमापूजन करून आदरांजली वाहण्यात आली. नाशिकरोड रेल्वेस्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास शनिवारी मध्यरात्री सार्वजनिक जयंतीउत्सव समितीतर्फे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष विलासराज गायकवाड, प्रभाग सभापती केशव पोरजे, नगरसेवक सुनील वाघ, हरिष भडांगे, कन्हैया साळवे, सुनील कांबळे, रिपाइं युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष ललित पाटील, संजय भालेराव, भारत निकम, समीर शेख, प्रकाश पगारे आदि उपस्थित होते.
 

Web Title: Mauli's maya was my bhumaraya ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.