शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

माउली, संकल्पसिद्धीचा संचालक भागवतला बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:25 AM

गुंतवणुकीवर वेगवेगळ्या योजनांद्वारे जादा मोबदल्याचे आमिष दाखवून नाशिक शहरासह राज्यातील विविध मोठ्या शहरांमध्ये कोट्यवधी रुपयांची हजारो ठेवीदारांची मागील दोन वर्षांपासून फसवणूक करणारा माउली, उज्ज्वलम सोसायटी तसेच संकल्पसिद्धी प्रॉड््क्ट इंडियाचा संचालक संशयित आरोपी विष्णू रामचंद्र भागवत यास नाशिक पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. त्यास जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने गुरुवारपर्यंत (दि.१३) पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देकोट्यवधींची फसवणूक : राज्यभरात गुन्हे दाखल

नाशिक : गुंतवणुकीवर वेगवेगळ्या योजनांद्वारे जादा मोबदल्याचे आमिष दाखवून नाशिक शहरासह राज्यातील विविध मोठ्या शहरांमध्ये कोट्यवधी रुपयांची हजारो ठेवीदारांची मागील दोन वर्षांपासून फसवणूक करणारा माउली, उज्ज्वलम सोसायटी तसेच संकल्पसिद्धी प्रॉड््क्ट इंडियाचा संचालक संशयित आरोपी विष्णू रामचंद्र भागवत यास नाशिक पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. त्यास जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने गुरुवारपर्यंत (दि.१३) पोलीस कोठडी सुनावली.शहरातील यापूर्वी मुंबईनाका पोलीस ठाण्यात भागवतविरुद्ध गुन्हा दाखल होता. तसेत शनिवारी (दि.८) त्याच्यासह साथीदारांविरुद्ध पुन्हा अंबड पोलीस ठाण्यात २ लाख १० हजारांची फसवणूक केल्याचा गुन्हा एका फिर्यादीवरून दाखल करण्यात आला. या गुन्ह्णाचा तपास सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत सुरू केला. भागतवने स्थापन केलेल्या माउली, संकल्पसिद्धी, उज्वलमसारख्या कंपन्यांच्या सात दलालांच्या सर्वप्रथम मुसक्या बांधल्या. त्यांनी ठेवीदारांच्या रकमेतून भागवतमार्फत कर्ज घेत महागड्या कारची खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. दलालांना गजाआड केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंबडमधील एका सोसायटीतून त्यांचा म्होरक्या संशयित भागवतलाही बेड्या ठोकल्या. त्यास न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भागवतविरुद्ध हिमाचल प्रदेशच्या चंबा पोलीस ठाण्यासह पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील आळेफाटा, नाशिकच्या जायखेडा, भांडूप, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, पिंपरी-चिंचवड या शहरांमध्येही गुन्हे दाखल आहेत. या सर्व पोलीस ठाण्यांना भागवत फसवणुकीच्या गुन्ह्णांत हवा होता. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्याविरुद्ध सुरुवातीपासूनच फास आवळला. काही दिवसांपूर्वीच ४ कोटी ८ लाख ६ हजार ६०९ रुपयांच्या १२ महागड्या कार राज्यातील मोठ्या शहरांमधून पोलिसांनी जप्त केल्या होत्या. तत्पूर्वी १५ जानेवारी २०२० रोजी आर्थिक गुन्हे शाखेने भागवतच्या दोन्ही कंपन्यांच्या संपत्तीवर टाच आणून त्याची २७ बॅँक खाती गोठविली....अशा केल्या होत्या कंपन्या स्थापनउज्ज्वलम अ‍ॅग्रो, माउली मल्टिस्टेट सोसा., ग्लोबल चेक इन्स्, ग्लोबल सिटिझन, नारायणगिरी महाराज फाउंडेशन, संकल्पसिद्धी प्रॉड््क्ट इंडिया, लिनी इंडस्ट्रिज यांसारख्या कंपन्या, सोसायट्या, फ र्मची स्थापना करून भागवत व त्याच्या साथीदारांनी संगनमताने विविध योजना काढून गुंतवणूकदारांना जादा मोबदल्याचे (कमिशन) आमीष दाखवून लाखो रुपये उकळले. नाशिकमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यात व राज्याबाहेरदेखील यांचा फसवणुकीचा प्रताप पोहोचल्याचे तपासात पुढे आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी