आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: August 3, 2015 00:24 IST2015-08-03T00:24:33+5:302015-08-03T00:24:33+5:30
आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल
नाशिक : पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेत नाही, या कारणास्तव दिल्या जाणाऱ्या मानसिक त्रासामुळेच नाईकवाडीपुरा येथील निलोफर शफीक शेख या महिलेने आत्महत्त्या केल्याची फिर्याद तिच्या कुटुंबीयांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली आहे़
ताजनपुरे चाळ येथील रहिवासी निलोफर शेख (२५) या महिलेने काही दिवसांपूर्वीच गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली आहे़ मात्र, निलोफर शेख यांनी संशयित शफिक रज्जाक शेख व वहिदा शफिक शेख यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती़ ही तक्रार मागे घेत नसल्याच्या कारणावरून त्यांना मानसिक त्रास व मारहाण केली जात होती़ या छळाला कंटाळून शेख यांनी आत्महत्त्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़
या प्रकरणी पोलिसांनी संशयित शफिक व वहिदा शेख यांच्याविरुद्ध आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)